दलाली बंद झाल्याने ग्राहकांना दिलासा; कणकवली गावठी आठवडा बाजाराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 03:44 PM2019-01-29T15:44:19+5:302019-01-29T15:46:22+5:30

सिंधुदुर्गात पहिला कणकवलीत गावठी आठवडा बाजार सुरू करण्यात आला. या गावठी आठवडा बाजारात शेतकरी स्वत:चा माल विकतात़.त्यांना कोणालाही दलाली न देता पैसे मिळतात त्याचा मला खरच आनंद वाटतो. ग्राहकांनाही कमी दरामध्ये चांगल्या वस्तू मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे येणे हे प्रगतीचे लक्षण असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढले.

Consumers get discontinued due to brokerage closure; Kankavali Weekend Week | दलाली बंद झाल्याने ग्राहकांना दिलासा; कणकवली गावठी आठवडा बाजाराची वर्षपूर्ती

कणकवली गावठी आठवडा बाजार वर्षपूर्ती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितेश राणे, संजना सावंत, सतीश सावंत, सुजाता हळदिवे, रणजित देसाई आदी उपस्थित होते .

googlenewsNext
ठळक मुद्देदलाली बंद झाल्याने ग्राहकांना दिलासा; कणकवली गावठी आठवडा बाजार वर्षपूर्ती शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे हे प्रगतीचे लक्षण : नारायण राणे

कणकवली : सिंधुदुर्गात पहिला कणकवलीत गावठी आठवडा बाजार सुरू करण्यात आला. या गावठी आठवडा बाजारात शेतकरी स्वत:चा माल विकतात़.त्यांना कोणालाही दलाली न देता पैसे मिळतात त्याचा मला खरच आनंद वाटतो. ग्राहकांनाही कमी दरामध्ये चांगल्या वस्तू मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे येणे हे प्रगतीचे लक्षण असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढले.

कणकवली येथील गावठी आठवडा बाजार वर्षपूर्ती व बाजार शेड लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, जि़ल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती सुजाता हळदिवे, जि़ल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, स्नेहसिंधुचे हेमंत सावंत, संदीप राणे, पंकज दळी, डॉ. प्रसाद देवधर, विजय शेट्टी, डॉ़. मिलींद कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते़.

हा कार्यक्रम कणकवली पंचायत समिती , स्रेहसिंधु पदविधर संघ व जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात  नारायण राणे पुढे म्हणाले, दलालीमुळे ५ रूपयांची वस्तू ५० रूपयांना विकली जाते़.
गावठी आठवडा बाजारात खऱ्या अर्थाने दलाली बाजूला राहिली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व या आठवडा बाजारासाठी ज्यांनी-ज्यांनी मेहनत घेतली त्यांना मी धन्यवाद देतो़.

शेतकऱ्यांच्या यशासाठी खऱ्या अर्थाने आवश्यक असलेले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. सतीश सावंत यांना भेट दिलेल्या वडाच्या आयुष्याप्रमाणे १०० वर्षे आयुष्य लाभो. या गावठी आठवडा बाजारासाठी खासदार फंडातून १० लाख रूपयांचा निधी मी जाहीर करतो.  मुंबईत गावठी आठवडा बाजारासाठी लागणारी मदत आम्ही सर्वतोपरी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

आमदार नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रातील पहिला गावठी आठवडा बाजार कणकवली पंचायत समितीने चांगले नियोजन करून राबविला. त्याचे खरे श्रेय माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम व त्यांच्या सहकाऱ्यांना जात आहे़. स्वत: शुक्रवारच्या बाजारात उभे राहून भाग्यलक्ष्मी साटम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काम करत होत्या. शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम आमच्या पंचायत समितीने केले आहे़. नेहमी कणकवलीचे नाव आले की 'राडा ' असे संबोधले जायचे, परंतू त्या नावाची ओळख महाराष्ट्रात आठवडा बाजाराच्या निमित्ताने पंचायत समितीने केली आहे.

सतीश सावंत म्हणाले, गावठी आठवडा बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तू ह्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. गावठी कोंबडी, अंडी, रानभाज्या यासारख्या गोष्टी येथे उपलब्ध होतात. भविष्यात गावठी आठवडा बाजार विक्रेत्यांची संस्था स्थापन करून थेट शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबविण्यात येईल.

डॉ़.प्रसाद देवधर, रणजित देसाई, विजय शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, वैदेही परब, रोहीणी बागवे, प्रिया परब, मनिषा सावंत, सुनिता ठाकूर, गीता आचरेकर या महिलांचा सत्कार करण्यात आला़ लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या शेडचे लोकार्पण नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या प्रकाराला दशावतार म्हणायचा काय?

कणकवलीत दहशतवाद असल्याचा नेहमीच विरोधक उल्लेख करतात़. मग सायंकाळी सात वाजल्यानंतर या गावठी आठवडा बाजाराच्या कार्यक्रमात महिला व लहान मुले आली आहेत़. मग एवढी माणसे कशी जमतात ? तर दुसरीकडे वेंगुर्लेत नगरसेविकेच्या घरात घुसून मारहाण केली जाते, त्याला काय दशावतार म्हणायचा काय? अशा तीव्र शब्दात भाजपा पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्लेत केलेल्या मारहाणीवर नारायण राणेंनी यावेळी टिकास्त्र सोडले.
 

Web Title: Consumers get discontinued due to brokerage closure; Kankavali Weekend Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.