पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याची  नीतेश राणेंची चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 04:52 PM2018-11-28T16:52:20+5:302018-11-28T16:53:02+5:30

शासनाच्या प्रधानमंत्री  पीक विमा योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील कोणत्याही शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार आमदार नीतेश राणे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.

Complaint against Nitish Ranike Chandrakant Patil for not getting benefit of crop insurance scheme | पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याची  नीतेश राणेंची चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याची  नीतेश राणेंची चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

Next
ठळक मुद्देयाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश कृषी विभागाना दिले आहेत.

सिंधुदुर्ग : शासनाच्या प्रधानमंत्री  पीक विमा योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील कोणत्याही शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार आमदार नीतेश राणे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश कृषी विभागाना दिले आहेत.

ज्या देवगड तालुक्यात हापूसचे सर्वात जास्त उत्पादन होते त्याच देवगड तालुक्यात आंब्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अशा तालुक्याला नुकसान भरपाई न देता विमा कंपनीने गैरव्यवहार केला आहे. याबाबत मंत्री पाटील यांना पाठविलेल्या पत्रात नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, २०१७-१८ मध्ये आंबा, काजू फळ पीक उत्पादन घेणाºया कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी शासनाच्या प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ६४४ शेतकºयांनी ३ कोटी ४१ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून  ६ हजार २०० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते.

जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी देवगड तालुक्यातील  देवगड, बापर्डे, मिठबांव, पडेल, पाटगाव, शिरगांव तसेच मालवण तालुक्यातील मालवण महसूल मंंडळात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमा कंपनीच्या या सर्वेक्षणामुळे  संपूर्ण देवगड तालुक्यातील आंबा  पिकासाठी संरक्षण घेतलेल्या एकाही शेतकºयाला कोणतीच नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नसल्याने या शेतकºयांवर अन्याय झाला आहे. याबाबत तालुक्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी नीतेश राणे यांनी कृषीमंत्री पाटील यांच्याकडे केली आहे. मंत्री पाटील यांनी या सर्वर्र् प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Web Title: Complaint against Nitish Ranike Chandrakant Patil for not getting benefit of crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.