ठळक मुद्देअभिनयाचा तास घेत विद्यार्थ्यांशी कलाकारांनी साधला संवादकथ्थक कलाप्रकार सादर विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मिळविली वाहवा

कुडाळ , दि. १९ :  पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयात कलाविषयक विविध उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत कॉमेडी शोच्या कलाकारांनी अभिनयाचा तास घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


पाट विद्यालयात कथ्थक नृत्य, चित्रकला, हार्मोनियम, गायन, वादन, पखवाज आदी विविध वर्ग घेतले जातात. यावेळी कथ्थक हा कलाप्रकार सादर करण्यात आला.

यावेळी कॉमेडी शोचे कलाकार प्रभाकर मोरे, माधवी जुवेकर, पूजा गोरे, रूपाली जाधव, योगेश म्हापणकर या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


यात विनोद क्षेत्रातील बारकावे, शालेय स्तरावर रंगमंचाचा वापर, वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कलाकृती सादर करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले