कणकवली नगरपंचायत प्रभाग रचना पुर्नरचना मसुदा प्रसिध्द, हरकती-सूचना देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:33 AM2017-12-11T11:33:52+5:302017-12-11T11:44:14+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पध्दतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी मसुदा प्रसिध्द करण्यात आहे. यासाठी 18 डिसेंबर 2017 पर्यंत हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Appeal to give information and objections to the draft of the reconstruction of Kankavli Nagar Panchayat Ward | कणकवली नगरपंचायत प्रभाग रचना पुर्नरचना मसुदा प्रसिध्द, हरकती-सूचना देण्याचे आवाहन

कणकवली नगरपंचायत प्रभाग रचना पुर्नरचना मसुदा प्रसिध्द, हरकती-सूचना देण्याचे आवाहन

Next
ठळक मुद्देहरकती असल्यास 18 डिसेंबर पर्यंत लेखी कळवाव्यातसंकेतस्थळावर आदेशाचा मसुदा प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पध्दतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी मसुदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यासाठी 18 डिसेंबर 2017  पर्यंत हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रियांसाठी राखून ठेवावयाचे प्रभाग त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग (स्त्रिंयासाठी राखून ठेवावयाचे प्रभाग धरुन) व उर्वरीत स्त्रिंयासाठी जे प्रभाग ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणारा आदेशाचा मसुदा क्रमांक एनपीअ‍े- 2801/2/2017 दिनांक 08 डिसेंबर 2017 ची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

नगरपंचायत कणकवली यांचे कार्यालयामध्ये नगरपंचायत क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहे. आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांचे नावे नगरपंचायत कणकवली येथे सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2017 रोजी सायं 06.00 वाजेपर्यंत पाहोचतील असे पाठवावे. तारखेनंतर संबंधित ठिकाणी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.
 

Web Title: Appeal to give information and objections to the draft of the reconstruction of Kankavli Nagar Panchayat Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.