अंगणवाडी मदतनीसने दिली शाळा जाळून टाकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:40 AM2019-03-16T11:40:44+5:302019-03-16T11:43:06+5:30

मालवण : वायरी येथील अंगणवाडीत मदतनीस असणा?्या वैशाली लुडबे यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जाळून टाकण्याची धमकी दिल्याने पालकांनी ...

Anganwadi helpers threaten to burn school | अंगणवाडी मदतनीसने दिली शाळा जाळून टाकण्याची धमकी

वायरी अंगणवाडी मदतनीसवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पालकांनी प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ यांच्याकडे सादर केले.

Next
ठळक मुद्देवायरी अंगणवाडी-शाळेच्या पालकांनी केला आरोप पालकांनी घेतला आक्रमक पवित्रा : अखेर मदतनीसवर कारवाई

मालवण : वायरी येथील अंगणवाडीत मदतनीस असणा?्या वैशाली लुडबे यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जाळून टाकण्याची धमकी दिल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मदतनीसवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत प्रशालेतील मुलांना पंचायत समिती बसवू असा इशारा दिल्यानंतर एकात्मिक बालविकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ यांनी तात्काळ प्रशालेला भेट देत संबंधित मदतनीस महिलेचा कारवाई प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला असून तिला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन दिवसापूर्वी प्रशालेच्या मुख्याध्यापिकेविरोधात दंड थोपटणारी अंगणवाडी मदतनीस चांगलीच अडचणीत आली आहे.

मालवण शहरातील वायरी शाळा नं . १ च्या आवारात अंगणवाडी आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुलांचा व आपला मानसिक छळ करत असल्याचे सांगत १२ मार्च रोजी सकाळी अंगणवाडीच्या मुलांना थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले होते.

याप्रकरणाची दखल उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेत सत्यता पडताळली असता पालकांनी मुख्याध्यापिकेविरोधात कोणतीच तक्रार नसल्याचे स्पष्ट करत मदतनीसच अंगणवाडी व प्रशालेच्या मुलांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता.

याबाबत  'त्या' मदतनीस महिलेने प्रशाला आवारात असणा?्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक तसेच ग्रामस्थांना मुलांना जीवे मारून शाळा पेटवून देण्याची धमकी दिल्याने पालक चांगलेच आक्रमक बनले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा मालंडकर यांनी गटशिक्षणाधिका?्यांचे लक्ष वेधले.

गेले काही महिने मदतनीस वैशाली लुडबे या मनमानी करून मुलांचा छळ करत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून अंगणवाडी प्रशाला आवारात भरायची नाही. त्यासाठी पयार्यी व्यवस्था करा. ती पालकांना धमकी देत असल्याने शाळेत शिकत असलेल्या आमच्या मुलांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पालकांनी गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांना विचारला. आमच्या भावनांचा कडेलोट झाला असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली.

यावेळी माजी नगरसेवक सुहास हडकर, सूर्यकांत फणसेकर, मुख्याध्यापिका मनीषा निकम, अलका गावकर, शिंदे, कृष्णा मालंडकर, बंड्या गावकर, शिवा चव्हाण, हेमंत भोजने, दर्शा शिरोडकर, आनंद गावकर, किशोर गावकर, सुभाष गावकर, विनोद शिरोडकर, विजय आडेकर, धनश्री शिरोडकर, भावना गावकर, नानू गावकर, प्रज्ञा चव्हाण, आरती गावकर, सतीश गावकर, विरेश चव्हाण, अतुल हडकर आदी पालक, पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

मदतनीस सक्तीच्या रजेवर

पालकांनी मदतनीसचा तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर एकात्मिक बालविकास केंद्राच्या वतीने तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ यांनी प्रशालेला भेट देत संबंधित मदतनीस यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून कारवाई प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. तसेच या अंगणवाडीसाठी दुस?्या मदतनीसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी पालकांनी त्यांना निवेदन सादर करताना वैशाली लुडबे यांनी पालकांना जीवे मारण्याची व शाळा जाळून टाकण्याची धमकी दिली आहे, त्यांच्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांनतर लुडबे यांची मदतनीस म्हणून वायरी अंगणवाडीसाठी नियुक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मुख्यसेविका स्नेहा सामंत, केंद्रप्रमुख अनिल खडपकर उपस्थित होते.
 

Web Title: Anganwadi helpers threaten to burn school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.