ओखी चक्रीवादळाबाबत इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 07:40 PM2017-12-02T19:40:53+5:302017-12-02T19:50:53+5:30

ओखी चक्रीवादळाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक २ डिसेंबर २०१७ पासून पुढील ४८ तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, समुद्रात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत.

Alert of alert skiing, alert alert to coastal area of ​​Sindhudurg district | ओखी चक्रीवादळाबाबत इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना

ओखी चक्रीवादळाबाबत इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना चक्रीवादळाबाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला राहणार मच्छीमारानी मासेमारीसाठी समुद्रात जावू नयेखोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारानी किना-यांवर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा

सिंधुदुर्गनगरी  : ओखी चक्रीवादळाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक २ डिसेंबर २०१७ पासून पुढील ४८ तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


या वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, समुद्रात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका कमी होईपर्यंत मच्छीमारानी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. जे मच्छिमार खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले आहेत त्यांनी किना-यांवर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना या बाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: किनारीपट्टी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्याची त्वरीत माहिती द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाची www.imd.gov.in ही कार्यालयीन वेब साईट पहावी. असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Web Title: Alert of alert skiing, alert alert to coastal area of ​​Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.