राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:06 PM2019-03-21T15:06:01+5:302019-03-21T15:07:32+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका विधी सेवा समितीमार्फत मालवण न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये मालवण तालुक्यातील विविध प्रकारची ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

78 cases were filed in the National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकाली

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकालीतडजोडीने प्रकरणे निकाली

मालवण : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका विधी सेवा समितीमार्फत मालवण न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये मालवण तालुक्यातील विविध प्रकारची ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

प्रथम देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून मालवण न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश रोहिणी काळे आणि उपस्थित पक्षकारांतील सर्वात ज्येष्ठ पक्षकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरणांमधील बँकांची व वीज मंडळाची मिळून ४५९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १४ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. दूरसंचारची २७० पैकी ४९ प्रकरणे तसेच दिवाणी वादपूर्व १ प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले.

यावेळी पॅनेलचे सदस्य म्हणून वकील लता कुबल व सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरकर तसेच न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक एन. पी. मालणकर, पी. आर. पाटकर, लघुलेखिका सी. व्ही. चव्हाण, वरिष्ठ लिपीक एस. एस. पाटील व एस. एन. गवंडी, कनिष्ठ लिपीक डी. बी. बांदेकर व बी. जी. मेहत्री यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे नियोजन व देखरेख वरिष्ठ लिपीक एस. पी. जाधव व कनिष्ठ लिपीक जे. टी. फर्नांडिस यांनी केले. या लोक अदालतीमध्ये संबंधित बँकांचे शाखाधिकारी, दूरसंचार कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

तडजोडीने प्रकरणे निकाली

मालवण न्यायालयातील प्रलंबित ३७ दिवाणी दाव्यांमधील ५ प्रकरणे व फौजदारी प्रकरणांमधील ९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये २४ लाख ९१ हजार ३५ रुपये व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये ९ लाख २१ हजार ९७४ रुपये एवढ्या रकमेची वसुली करण्यात आली.

Web Title: 78 cases were filed in the National Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.