बेडरुमच्या रंगावरुन उघड होतं तुमच्या लैंगिक जीवनाचं गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:40 PM2019-01-14T15:40:14+5:302019-01-14T15:41:52+5:30

जसा कपड्यांचा रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाबाबत आणि मूडबाबत सांगतो, तसाच बेडरुमचा रंगही तुमच्या लैंगिक जीवनाबाबतचे सीक्रेट दर्शवतो.

Your bedroom colours tells about your sex life secrets, know how | बेडरुमच्या रंगावरुन उघड होतं तुमच्या लैंगिक जीवनाचं गुपित!

बेडरुमच्या रंगावरुन उघड होतं तुमच्या लैंगिक जीवनाचं गुपित!

googlenewsNext

जसा कपड्यांचा रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाबाबत आणि मूडबाबत काही सांगतो, तसाच बेडरुमचा रंगही तुमच्या लैंगिक जीवनाबाबतचे सीक्रेट दर्शवतो. रंगांशिवाय लैंगिक जीवनातील उत्साह अर्धवट आहे. रंग केवळ मूडच ठिक करतात असं नाही तर लैंगिक जीवन अधिक रोमॅंटिक आणि सुंदर करण्यासही मदत करतात. कसे? ते जाणून घेऊ....

लाल

लाल रंग प्रेमाचा, रोमान्सचा आणि उत्तेजनेचा प्रतिक आहे. ज्या कपल्सच्या बेडरुमला लाल रंग असतो, ते त्यांचं लैंगिक जीवन पूर्णपणे एन्जॉय करतात. त्यांचं लैंगिक जीवन चांगलं आणि नात्यातील बॉंडिंगही मजबूत असतं. बेडरुमला लाल रंग असल्याने पार्टनर रोमॅंटिक होतात, ज्यामुळे लैंगिक जीवनातील उत्साह आणि उत्तेजना कायम राहते. 

तपकिरी

ज्या कपल्सच्या बेडरुमचा रंग तपकिरी असतो, ते फार रोमॅंटिक असतात. पार्टनरच्या भावनांना आणि गरजांना चांगल्याप्रकारे समजतात. त्यांना प्रायव्हसी पसंत असते. रिलेशनशिप एक्सपर्टनुसार, तपकिरी रंगाचा उल्लेख होताच सर्वाकआधी चॉकलेटचा विचार डोक्यात येतो. एका रिसर्चनुसार, प्रेम आणि चॉकलेटमध्ये खोलवर संबंध आहे. चॉकलेट खाल्ल्यावर व्यक्तीच्या मनात रोमान्स आणि आकर्षण निर्माण होतं. त्याचप्रमाणे बेडरूमला तपकिरी रंग असल्यावर कपलमध्येही रोमान्स येतो. 

गुलाबी

ज्या कपल्सच्या बेडरुममध्ये गुलाबी रंग असतो, त्यांच्या नात्यात चांगलं ट्यूनिंग असतं. दोन्ही पार्टनर स्वभावाला फार रोमॅंटिक असतात, पण जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा महिला पार्टनर असहज होते. पुरुष पार्टनरला तितका सपोर्ट मिळत नाही. पण दोघेनंतर बोलून यावर सोल्यूशन काढतात. 

जांभळा

तज्ज्ञांनुसार, पर्पल म्हणजेच जांभळा रंग पॅशनेट रंग मानला जातो. ज्या कपल्सच्या बेडरुममध्ये जांभळा रंग असतो, ते दुसऱ्या कपल्सच्या तुलनेत लैंगिक जीवन अधिक एन्जॉय करतात. पण पार्टनरच्या संतुष्टीपेक्षा आपल्या सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनला अधिक महत्त्व देतात. 

निळा

हा रंग एकीकडे मानसिक शांतता आणि चांगल्या झोपेचं प्रतिक मानला जातो. तर दुसरीकडे या रंगाला लैंगिक भावना वाढवणारा रंगही मानला जातो. जे कपल त्यांच्या बेडरुममध्ये निळा रंग लावतात, ते लैंगिक क्रियेचा पुरेपूर आनंद घेतात. त्यांच्यासाठी लैंगिक क्रिया एक आर्ट असते. त्यामुळे ते शारीरिक संबंध ठेवण्यात घाई करत नाहीत.

हिरवा

हिरवा रंग हा हिरवळीचा प्रतीक आहे. जे कपल्स त्यांच्या बेडरुममध्ये हिरवा रंग लावतात, ते लैंगिक जीवनाप्रति सकारात्मक राहतात. मुळात हे लोक शारीरिक संबंधाबाबत फार पॅशनेट नसतात, पण आपल्या पार्टनरसोबत इमानदार असतात.  

केशरी

ज्या कपल्सच्या बेडरुमध्ये केशरी रंग असतो ते शारीरिक संबंधाबाबत जरा वाइल्ड असतात. त्यांच्यासाठी शारीरिक संबंध ठेवणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच त्यांच्यासाठी फोरप्ले सुद्धा महत्त्वाचा असतो. सेक्शुअल फॅंटसीमध्ये जगणं त्यांना आवडतं. 

पिवळा

ज्या कपल्सच्या बेडरुमला पिवळा रंग असतो ते फार एनर्जेटिक असतात. पण त्यांच्या एनर्जेटिक असण्याचा प्रभाव त्यांच्या लैंगिक जीवनावर बघायला मिळत नाही. त्यांचं लैगिक जीवन जरा कॉम्प्लिकेटेड असतं. 

Web Title: Your bedroom colours tells about your sex life secrets, know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.