लैंगिक जीवन : ऑर्गॅज्म म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या ७ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:59 PM2019-02-13T15:59:31+5:302019-02-13T16:10:00+5:30

शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अनेकांना ऑर्गॅज्मच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात. तर अनेकांना याबाबत काहीच माहिती नसते.

What exactly is the orgasm? Know these 7 things | लैंगिक जीवन : ऑर्गॅज्म म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या ७ गोष्टी

लैंगिक जीवन : ऑर्गॅज्म म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या ७ गोष्टी

googlenewsNext

ऑर्गॅज्म हा शब्द अनेकदा वाचला आणि ऐकला जातो. शारीरिक संबंधानंतर होणारी संतुष्टी म्हणजे ऑर्गॅज्म. शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अनेकांना ऑर्गॅज्मच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात. तर अनेकांना याबाबत काहीच माहिती नसते. शारीरिक संबंध ठेवताना तयार झालेली उत्तेजनेदरम्यान निर्माण झालेला ब्लड फ्लो जेव्हा जेनिटल एरिया रोखून ठेवू शकत नाही तेव्हा ऑर्गॅज्मचा अनुभव होतो. या स्थितीमध्ये ब्लडचा फ्लो शरीराच्या इतर भागांमध्ये अधिक होतो आणि मांसपेशीमधील तणाव नष्ट होतो. ऑर्गॅज्मबाबतच्या अशाच आणखीही काही गोष्टी जाणून घेऊ.....

महिलांमध्ये ऑर्गॅज्म

अमेरिकेतील वयस्कांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, महिलांमध्ये तीन पुरुषांच्या बरोबरीत ऑर्गॅज्म होतं. प्रत्येक तीनपैकी एका महिलेला पार्टनरसोबत ऑर्गॅज्मची समस्या होते आणि ८० टक्के महिला केवळ शारीरिक संबंध ठेवून ऑर्गॅज्मचा अनुभव घेऊ शकत नाहीत. मात्र जास्तीत जास्त महिलांना हस्तमैथुनादरम्यान ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो. 

पुरूषांमध्ये स्खलनाविनाही ऑर्गॅज्म

स्खलन आणि ऑर्गॅज्म या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. ऑर्गॅज्मची जाणीव मेंदूमध्ये होते आणि स्खलन ही शरीरातून वीर्य बाहेर येण्याची शारीरिक प्रक्रिया आहे. 

प्रसुतीदरम्यान ऑर्गॅज्म

जर्नल ऑफ सेक्सॉलॉजी(अमेरिका) मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, काही महिलांना बाळाच्या जन्मावेळी सुद्धा ऑर्गॅज्म होतं. पण असा अनुभव येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. 

ऑर्गॅज्मनंतर आनंद

ऑर्गॅज्मनंतर तुम्हाला आधीपेक्षा जास्त आनंद, संतुष्ट आणि ऊर्जेचा अनुभव मिळतो. कारण ऑर्गॅज्म नंतर आपल्या शरीरात एंडॉर्फिन आणि एक ब्रेन केमिकल रिलीज होतं. हे केमिकल पीईए नावानं ओळखलं जातं. 

नियमित ऑर्गॅज्मने डिप्रेशन दूर होतं

नियमितपणे ऑर्गॅज्मचा अनुभव झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो. एक्सपर्टचं असं मत आहे की, याने व्यक्तीचं आयुष्य वाढतं. कारण याचा हृदय आणि इम्यून सिस्टीमवर चांगला प्रभाव पडतो. 

ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड

सेंटर फॉर मॅरिटल अॅन्ड सेक्शुअल स्टडीज कॅलिफोर्नियामधील एका प्रयोगादरम्यान ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम झाला होता. १९९६ मध्ये एका महिलेने ४५ सेकंदात ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 

२० महिलांना किसने ऑर्गॅज्म

एका रिसर्चनुसार, १० टक्के महिलांना एक्सरसाइजदरम्यान, काही महिलांना ब्रेस्टला स्पर्श केल्यावर आणि २० टक्के महिलांना किस केल्यावर ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो. 

Web Title: What exactly is the orgasm? Know these 7 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.