लैंगिक जीवन : मनात 'या' भीतीला देऊ नका थारा, नाही तर वाजतील बारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:16 PM2019-02-21T15:16:05+5:302019-02-21T15:17:30+5:30

तसा तर अनेक लोकांसाठी शारीरिक संबंधाचा अनुभव चांगलाच असतो, पण काही लोकांना शारीरिक संबंधाशी निगडीत गंभीर परिणाम भोगावे लागतात.

These sex related fears do not let you enjoy | लैंगिक जीवन : मनात 'या' भीतीला देऊ नका थारा, नाही तर वाजतील बारा!

लैंगिक जीवन : मनात 'या' भीतीला देऊ नका थारा, नाही तर वाजतील बारा!

तसा तर अनेक लोकांसाठी शारीरिक संबंधाचा अनुभव चांगलाच असतो, पण काही लोकांना शारीरिक संबंधाशी निगडीत गंभीर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांच्या मनात शारीरिक संबंधाबाबत काही भीती खोलवर रूतलेल्या असतात की, ते शारीरिक संबंध एन्जॉय करू शकणार नाहीत. याच मागचं कारण त्यांचे याआधीचे अनुभव असू शकतात. जे चांगले राहिले नसतील. त्याचे दुष्परिणाम त्यांना आता भोगावे लागू शकतात. चला जाणून घेऊ आणखी कोणत्या भीतीमुळे अनेकजण शारीरिक संबंधाचा पुरेसा आनंद घेऊ शकत नाहीत. 

प्रेग्नन्सीची भीती

जेव्हा वयस्क लोक त्याच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात, पण त्यांना प्रेग्नन्सी नको असते तेव्हा पार्टनरच्या मनात प्रेग्नन्ट होण्याची भीती असणे साहजिक आहे. पण अशात दोघेही शारीरिक संबंध एन्जॉय करू शकत नाहीत. याचा उपाय म्हणजे सुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे तुम्ही कंडोमचा वापर करू शकता. जर योग्यप्रकारे कंडोमचा वापर केला गेला तर तुम्हाला वाटणारी भीती राहणार नाही. 

वेदना होण्याची भीती

ज्या तरूणी किंवा महिलांनी पूर्वी कधीही शारीरिक संबंधाचा अनुभव घेतला नसेल त्यांच्या मनात याप्रकारची भीती असणे सामान्य बाब आहे. अनेकांना असं वाटत असतं की, शारीरिक संबंधातून होणाऱ्या वेदनांचा सामना करण्यापेक्षा व्हर्जिन राहिलेलं बरं. असं होण्याचं कारण म्हणजे अनेकांच्या मनात ही धारणा असते की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना खूप वेदना होतात. मात्र शारीरिक संबंधावेळी वेदना होतीलच असे नाही. योग्य ती काळजी घेतली तर वेदना होणार नाहीत. यावेळी तुम्ही लुब्रिकंटचा वापर करू शकता. 

शरीरासंबंधी भीती

अनेकजण याआधी कुणाशीही इंटिमेट झालेले नसतात त्यामुळे त्यांना ही भीती वाटत असते. त्यांना भीती असते की, जर न्यूड शरीर पार्टनरला आवडलं नाही तर काय? तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ९० टक्के शारीरिक संबंधाशी निगडीत भीती ही बॉडी इमेजशी संबंधित असते. इथे सर्वात महत्त्वाचा असतो, तो तुमचा आत्मविश्वास आणि पार्टनरसोबतचं तुमचं इमोशनल कनेक्शन. यावर फोकस करा. 

शरीराच्या दुर्गंधीची भीती

आपल्या शरीराबाबत असणारी असुरक्षिततेच्या भावनेसारखीच अनेकांच्या मनात शरीराच्या दुर्गंधीचीही भीती असते. असे लोक नेहमीच कुणाजवळ जाण्याआधी स्वत:ला प्रश्न करतात की, माझ्या शरीराची दुर्गंधी तर येत नसेल ना? जर तुम्ही माऊथ वॉश किंवा डिओड्रन्टचा योग्यप्रकारे वापर करत नसाल तर पार्टनरजवळ जाण्याआधी ही भीती तुम्हाला वाटू शकते.  यावर एकच उपाय हा आहे की, पुढीलवेळी या गोष्टींचा वापर चांगल्याप्रकारे करावा. 

संतुष्ट न करण्याची भीती

ही भीती सामान्यपणे पुरूषांमध्ये असते. जास्तीत जास्त पुरूष हे नेहमी या गोष्टीने विचारात असतात की, त्यांच्या गुप्तांगाची साइज योग्य आहे की, नाही? मी जास्त वेळ लैंगिक क्रिया करू शकेल की नाही? जर पार्टनरच्या ऑर्गॅज्मआधीच माझं इजॅक्यूलेशन झालं तर काय होईल? अशाप्रकारच्या वेगवेगळ्या भीती पुरूषांमध्ये असणे सामान्य आहे. पॉर्न आणि फिटनेस मॉडल पाहून हे सुद्धा त्यांच्यासारखे होण्याचा विचार करू लागतात. पण या सर्व गोष्टी विसरून आणि मनातून भीती काढून पार्टनरसोबत मनसोक्त एन्जॉय करा.  
 

Web Title: These sex related fears do not let you enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.