लैंगिक जीवन : पार्टनरचा इंटरेस्ट कमी झालाय? वापरा या नॉटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:12 PM2019-04-10T16:12:01+5:302019-04-10T16:14:38+5:30

सामान्यपणे असं होतं की, वयाच्या एका टप्प्यावर वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये शारीरिक संबंधाची रुची कमी होऊ लागते. यामुळे दोघांचही लैंगिक जीवन थांबतं.

Sexual interest is getting reduced of your female partner then adopt these special tips | लैंगिक जीवन : पार्टनरचा इंटरेस्ट कमी झालाय? वापरा या नॉटी टिप्स!

लैंगिक जीवन : पार्टनरचा इंटरेस्ट कमी झालाय? वापरा या नॉटी टिप्स!

(Image Credit : YourTango)

सामान्यपणे असं होतं की, वयाच्या एका टप्प्यावर वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये शारीरिक संबंधाची रुची कमी होऊ लागते. यामुळे दोघांचही लैंगिक जीवन थांबतं. तज्ज्ञ सांगतात की, तरुण आणि तणावमुक्त राहण्यासाठी वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध फार महत्त्वाची बाब आहे. तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत असं काही जाणवत असेल तर तुम्ही त्यांना पुन्हा या सुंदर नात्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी करावं. यासाठी काही खास टिप्स फॉलो करा. 

पार्टनर नाही, जागा बदला

शारीरिक संबंधात एका पार्टनरची रुची कमी झाल्यावर पार्टनर बदलण्याचा विचार येणे तसं स्वाभाविक आहे. पण हे एका नात्यासाठी कधीही चांगलं नाही. त्यामुळे गरजेचं आहे की, पार्टनरऐवजी रोमान्स करण्याची जागा बदला. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सतत एकाच जागेवर एकाच प्रकारचा रुटीन फॉलो केल्याने शारीरिक संबंधात कंटाळा येतो. त्यामुळे बरं होईल की, तुम्ही रोमान्ससाठी जागा बदला. हे लक्षात ठेवा की, ती जागा रोमॅंटिक असावी आणि नसेल तर तुम्ही त्या जागेला रोमॅंटिक टच देऊ शकता. 

रोमान्समध्ये रोमांचही गरजेचा

एकाचप्रकारे किंवा दोन तीन नेहमीच्या स्टाइलने शारीरिक संबंध ठेवल्याने दोघांनाही कंटाळा येणे स्वाभाविक आहे. अशावेळी तज्ज्ञही काहीतरी वेगळं करण्याचा सल्ला देतात. अशात काही वेगळं आणि रोमांचक काही कराल तर कामात येईल. पण हेही लक्षात ठेवा की, लैंगिक जीवन रोमांचक करण्याच्या नादात असं काही ट्राय करु नका की, नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. 

ल्यूबचा करा वापर

हे गरजेचं नाही की, शारीरिक संबंधातील इंटरेस्ट कमी होण्याचं कारण केवळ रुटीन पोजिशन किंवा नेहमीचीच जागा असेल. असही होऊ शकतं की, तुमच्या फीमेल पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना असतील. खरंतर जेव्हा फीमेल प्रायव्हेट पार्टमध्ये जेव्हा कोरडेपणा येतो तेव्हा आणि जेव्हा त्यात नैसर्गिक ओलावा येत नाही तेव्हा त्यांना वेदना होतात. अशावेळी महिला शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करु लागतात. त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान ल्यूबचा वापर करा. पण त्याआधी ल्यूबबाबत पूर्ण माहिती जाणून घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तेजित करण्यासाठी वेगळ्या जागांवर किस

पार्टनरला सिड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरा. प्लेफुल अंदाजात पार्टनरला अशा जागांवर किस करा जिथे त्यांना अधिक उत्तेजित वाटेल. जसे की, मानेवर, कानाला आणि ओठांवर. तसेच प्रेमाच्.या गप्पा केल्या तरी फायदा होईल.

Web Title: Sexual interest is getting reduced of your female partner then adopt these special tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.