लैंगिक जीवन : काय खरंच शारीरिक संबंध आणि सुंदरतेचा काही संबंध आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:56 PM2019-03-11T15:56:43+5:302019-03-11T15:57:01+5:30

नेहमीच तुम्ही लोकांकडून ऐकलं असेल की, फारच निखरलाय चेहरा, काय गोष्ट आहे? हा केवळ एखाद्या व्यक्तीची गंमत करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे.

Sex life: Is there really any relation between sex and beauty | लैंगिक जीवन : काय खरंच शारीरिक संबंध आणि सुंदरतेचा काही संबंध आहे?

लैंगिक जीवन : काय खरंच शारीरिक संबंध आणि सुंदरतेचा काही संबंध आहे?

Next

(Image Credit : Bonobology.com)

नेहमीच तुम्ही लोकांकडून ऐकलं असेल की, फारच निखरलाय चेहरा, काय गोष्ट आहे? हा केवळ एखाद्या व्यक्तीची गंमत करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे की, खरंच सुंदरतेचा प्रेम आणि सेक्ससोबत काही संबंध आहे? आतापर्यंत तुम्ही भलेही याला गंमत म्हणून पाहत असाल पण खरंच सेक्स आणि सुंदरतेचा खोलवर संबंध आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब स्पष्ट झाल्याचं वृत्त thehealthsite.com ने दिलं आहे.

काय सांगतो शोध?

या शोधात सिद्ध झालं आहे की, शारीरिक संबंध ठेवल्याने जे हार्मोन्स निघतात. त्याने त्वचेचा फायदा होतो. रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचेवर एक वेगळाच उजाळा येतो. सुंदरताही वाढते. पण हे शक्य तेव्हाच होतं जेव्हा शारीरिक संबंध नैसर्गिक पद्धतीनेच केला जाईल. 
स्कॉटलॅंडच्या रॉयल एडिनबर्ग हॉस्पिटलमधील अभ्यासकांनी एका उपाय सांगतिला आहे. जो मानवी जीवनाचा एक मुख्य भाग आहे.

अभ्यासकांनी याबाबत काही दिशानिर्देशही जारी केले आहेत. ते आहेत प्रेमपूर्वक शारीरिक संबंध म्हणजे केवळ आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानेच सुंदरता वाढते. कारण अनसेफ शारीरिक संबंधामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. सोबतच स्ट्रेसही वाढतो. याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. 

वाढतं वय थांबवा सुंदरता वाढवा

शारीरिक संबंधामुळे नैसर्गिकरित्या आनंद मिळतो आणि उत्साह वाढतो. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, कमी अंतराने शारीरिक संबंध ठेवल्याने(आठड्यातून कमीत कमी ३ वेळा) व्यक्तीचं वय त्याच्या खऱ्या वयाच्या तुलनेत कमी दिसतं. कारण सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी कोणत्याही एक्सरसाइजपेक्षा कमी नाही. याने त्वचेला तरूण दिसण्याला जबाबदार असणारे आणि आनंद देणारे हार्मोन्स रिलीज होतात. याने तुमचा चेहरा ग्लो करू लागतो आणि त्वचा टाइट होते.

जाणून घ्या फायदे

- शारीरिक संबंधामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

- शारीरिक संबंधामुळे कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेत. सोबतच हृदय आणि मेंदूचंही आरोग्य चांगलं राहतं. 

- शारीरिक संबंधामुळे सुंदरतेत भर पडते.

- शारीरिक संबंधाने त्वचेचं वय ४ वर्षाने कमी केलं जाऊ शकतं. 

आनंदाचा अनुभव

शारीरिक संबंध अशी अ‍ॅक्टिविटी आहे ज्यामुळे मेंदू एकत्र एक्साइट आणि रिलॅक्स होतो. शारीरिक संबंधादरम्यान शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि याने पेशींना नवीन ऊर्जा मिळते. याने आपला मूड चांगला होतो. 

निरोगी केस

शारीरिक संबंधादरम्यान ब्लड सर्कुलेशन वाढतं. याने केसांना एक नैसर्गिक मॉइश्चरायजर मिळतं. याने तुमचे केस चमकदार होतात. 

त्वचा मुलायम आणि स्थिर राहते

ज्या महिला नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांच्या त्वचेत एस्ट्रोजन हार्मोन्सचा स्त्राव अधिक होतो. त्यासोबतच त्वचा नैसर्गिकपणे मुलायम आणि स्थिर करणाऱ्या कोलेजन हार्मोन्सचा स्त्रावही अधिक होतो. 

सुरकुत्या दूर होतात

भलेही तुम्ही उन्हाच्या हानिकारक किरणांपासून दूर राहता, पण तरी सुद्धा तुम्हाला सुरकुत्या होतात. या सुरकुत्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमन्यांनाही होऊ शकतात. याने हृदयावर वाईट प्रभाव पडतो. हृदय आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया समान आहे. शारीरिक संबंधामुळे शरीरात रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे चेहरा चमकदार होतो. 

पोटावरील चरबी हटवा

शरीरात जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झालं तर याचा थेट प्रभाव आपल्या पोटावर पडतो. पोटावर जास्त चरबी जमा होऊ लागते. ऑक्सीटोसिन यापासून बचाव करतं. म्हणजे ऑर्गॅज्ममुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी दूर होते.

तणाव होतो दूर

तणावामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. ऑर्गॅज्मदरम्यान शरीरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिटोसिनचा स्त्राव होऊ लागतो. याने तुमचा तणाव आपोआप कमी होतो. कारण यावेळी शरीरात होणाऱ्या प्रक्रियेने तणाव वाढवणारे कार्टिसोल हार्मोन दूर केले जातात.

Web Title: Sex life: Is there really any relation between sex and beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.