Natural foods for better sex life | लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवणारी फळं अन् भाज्या
लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवणारी फळं अन् भाज्या

लैंगिक जीवन एनर्जेटिक ठेवण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सायकॉलॉजिकल थेरपी आणि महागड्या औषधांचा वापर करणे आता जुन्या गोष्टी झाल्या आहेत. असे अनेक फळं आणि पदार्थ आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची कामेच्छा वाढवू शकता. ही फळं तुमची उत्तेजना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

१) चॉकलेट - चॉकलेटला नेहमीच रोमान्स आणि पॅशनचं प्रतिक मानलं गेलं आहे. असे म्हटले जाते की, एका पॅशनेट फोरप्लेनंतर महिला जितके इंडॉर्फिन हॉर्मोन्स रिलीज करतात, त्यापेक्षा चार पटीने जास्त इंडॉर्फिन केवळ चॉकलेट खाल्ल्याने महिलांच्या शरीरात तयार होतात. 

२) संत्री - संत्री हे अनेकजण आवडीने खातात. गोड-आंबट लागणारं हे फळ तुमची कामेच्छा वाढवण्यासाठी चांगलंच फायदेशीर ठरतं. 

३) अंडी - अंड्यांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी ६ ने स्ट्रेस कमी करण्यास आणि लैंगिक क्रियेची इच्छा वाढवण्यास मदत होते. त्यासोबतच अंडी खाल्ल्याने आरोग्यही चांगलं राहतं. 

४) कलिंगड - कलिंगडाला नैसर्गिक वायग्रा मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असतं, ज्यामुळे रक्त नलिका पसरवण्यात मदत करतं. दररोज कलिंगड खाल्ल्याने तुमची लैंगिक क्षमता अधिक वाढू शकते. 

५) केसर - जर तुम्हाला लगेच फरक बघायला असेल आहारातून केसरचं सेवन करणे सुरू करा. एका रिसर्चनुसार केसरने कामेच्छा भरपूर वाढते. 

६) लसूण - तुम्हाला तुमची कामेच्छा वाढवायची असल तर त्यासाठी लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. रोज लसणाची एक कळी खाल्ल्यास तुमची लैंगिक क्षमता वाढेल. किंवा भाज्यांमधून याचा वापर करून शकता. लसणामधील कामोत्तेजक गुण महिला आणि पुरूष दोघांमध्येही कामेच्छा वाढवतो. 

७) प्रोटीन - आहारातून प्रोटीनचं भरपूर प्रमाण असू द्या. त्यासाठी दूध, दुधापासून पदार्थ, मासे, मांसाहार करा. यानेही तुमची कामेच्छा वाढेल.

८) संतुलित आहार - लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी आहारावर काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे आहे. आहारात लो फॅटचे पदार्थांचा समावेश करा. फळं आणि भाज्या जास्त खाव्यात. याने शरीर निरोगी तर राहिलच सोबतच कामेच्छाही वाढेल.


Web Title: Natural foods for better sex life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.