लैंगिक जीवन : शीघ्रपतनाबाबत तुम्हालाही आहेत का हे गैरसमज?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 04:29 PM2019-04-24T16:29:37+5:302019-04-24T16:31:15+5:30

तुम्हीही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच शीघ्रपतनाबाबत अनेकदा ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल.

Myths and facts about sexual problem premature ejaculation | लैंगिक जीवन : शीघ्रपतनाबाबत तुम्हालाही आहेत का हे गैरसमज?

लैंगिक जीवन : शीघ्रपतनाबाबत तुम्हालाही आहेत का हे गैरसमज?

Next

तुम्हीही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच शीघ्रपतनाबाबत अनेकदा ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे इंटरकोर्सदरम्यान केवळ १ मिनिटात किंवा त्याही कमी वेळेत इजॅक्युलेट करणं ही समस्या. या समस्येत अनेकदा पेनिस्ट्रेशनआधीच इजॅक्युलेशन होतं. त्यामुळे दोन्ही पार्टनर शारीरिक संबंध ठेवूनही संतुष्ट होत नाहीत. ही एक कॉमन लैंगिक समस्या आहे. आणि याच्याशी संबंधित अनेक गैरसमजही लोकांमध्ये आहेत, पण सत्य तुम्हाला माहीत असायला हवं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार खालीलप्रमाणे काही तथ्य सांगता येतील. 

गैरसमज - ही तरुणांशी निगडीत समस्या आहे.

सत्य -  प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या कोणत्याही वयस्क पुरुषाला होऊ शकते. त्यांचं वय किती आहे याचा काही संबंध नसतो. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन संदर्भात २ हजार पुरुषांवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशने पीडित ७२ टक्के पुरुषांचं वय हे ४० पेक्षा अधिक होतं. 

गैरसमज - ही जन्मजात समस्या आहे.

सत्य - प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या ही जन्मजात कुणात नसते. परफॉर्मेन्स प्रेशर, एंजायटी, स्ट्रेस आणि अनेक वेगवेगळे आजार व औषधांच्या सेवनामुळेही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या होते. पण काही केसेसमध्ये ही समस्या जेनेटिक असू शकते. पण हे प्रमाण कमी असल्याचं बोललं जातं. 

गैरसमज - त्याला घाई होती म्हणून...

सत्य - ज्या महिलांच्या पार्टनर्सना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या असते अशा महिलांचा नेहमीच हा गैरसमज असतो की, त्यांच्या पार्टनरला इंटरकोर्स संपवण्याची घाई होती. त्यामुळे त्यांनी लवकर इजॅक्युलेट केलं. पण सत्य हे आहे की, याप्रकारच्या समस्येत पुरुषांची काही चूक नसते. व्यक्ती त्यांच्या इजॅक्युलेशनवर कंट्रोल ठेवू शकत नाहीत आणि यामुळे त्यांना अनेकदा लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो.  

गैरसमज - वायग्राने समस्येचं समाधान होतं. 

सत्य - या गोष्टीत अजिबातच काही तथ्य नाहीये. वायग्राचं सेवन केल्याने प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येत काहीच सुधारणा होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टर किंवा सेक्स एक्सपर्टशी संपर्क करुनच समस्येचं निराकरण करावं लागेल. 

Web Title: Myths and facts about sexual problem premature ejaculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.