कंडोमबाबतच्या 'या' ८ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:02 PM2019-03-18T16:02:54+5:302019-03-18T16:06:41+5:30

कंडोममुळे एचआयव्ही-एड्सपासून तर बचाव होतोच सोबतच वेगवेगळ्या लैंगिक संक्रमणापासूनही बचाव होतो. त्यामुळेच सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

Interesting and rare things about condom that one should know | कंडोमबाबतच्या 'या' ८ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

कंडोमबाबतच्या 'या' ८ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Next

कंडोममुळे एचआयव्ही-एड्सपासून तर बचाव होतोच सोबतच वेगवेगळ्या लैंगिक संक्रमणापासूनही बचाव होतो. त्यामुळेच सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. पण याच्याशी काही खास जुळलेल्या आहेत. त्याबाबत फार कमी लोकांना माहिती असेल.  

केवळ इतके लोक करतात वापर

नवभारत टाइम्सने दिलेल्या एका माहितीनुसार, सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमबाबत जगभरात जागरूकता केली जाते. बोललं जातं, लिहिलं जातं. लोकांना याचं महत्त्व सुद्धा माहीत आहे. मात्र तरी सुद्धा जगभरातील केवळ ५ टक्के लोकच कंडोमचा वापर करतात. 

कंडोमची व्हरायटी

जास्तीत जास्त कंडोम्स हे लेटेक्सपासून तयार केलेले असतात. पण जर कुणाला लेटेक्सची अॅलर्जी असेल तर त्यांच्यासाठी नॉन-लेटेक्सचे कंडोमही बाजारात उपलब्ध आहेत. हे कंडोम पॉलीयूरीथेनपासून तयार केलेले असतात. काही कंडोम हे पॉलीआयसोप्रीनपासूनही तयार केलेले असतात. 

लैंगिक क्रियेवर प्रभाव नाही

अनेकजण असं मानतात की, शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर केल्यावर दुप्पट आनंद मिळतो. पण असं अजिबात नाहीये. नॅशनल सेक्स स्टडीच्या एका सर्व्हेनुसार, कपल्सद्वारे शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर करणे किंवा न करणे याने त्यांना मिळणाऱ्या अनुभवावर काहीही फरक पडत नाही. 

किती महिला खरेदी करता कंडोम

काही वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार, ४० टक्के महिला कंडोम खरेदी करतात. 

जगातला सर्वात मोठा कंडोम

जगातला सर्वात मोठा कंडोम TheyFit हा आहे. हा कंडोम २४० एमएम लांब आणि ६९ एमएम रूंद आहे. हा कंडोम सामान्य कंडोमपेक्षा आकाराने बराच मोठा आहे.  

इजिप्त नागरिक आणि कंडोम

लेटेक्सच्या कंडोमआधी जनावरांच्या ब्लॅडरपासून तयार केलेल्या कंडोमचा वापर केला जात होता. इजिप्तचे लोक या कंडोमचा वापर करायचे. तसेच हे लोक माश्याच्या त्वचेपासून, लिनन आणि सिल्कपासून तयार कंडोमचाही वापर करत होते.  

कंडोममध्ये इलेक्ट्रीक शॉक

कंडोम जेव्हा तयार केला जातो तेव्हा यादरम्यान यात इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. असं करून कंडोम फाटलेला किंवा कापलेला तर नाही किंवा त्या छिद्र तर नाही ना हे तपासलं जातं. 

चार वर्ष चालतो कंडोम

जर कंडोम थंड किंवा उष्ण ठिकाणी ठेवला गेला तर चार वर्षांपर्यंत आरामात वापरला जाऊ शकतो. चार वर्ष हे पूर्णपणे सुरक्षित राहतात. 

Web Title: Interesting and rare things about condom that one should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.