लैंगिक जीवन : तुम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहात की नाही? असे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:34 PM2019-03-04T17:34:09+5:302019-03-04T17:34:40+5:30

कपलमध्ये फिजिकल इन्टमेसी फिल होणे सामान्य बाब आहे. सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये घाई करणे शारीरिकसोबतच भावनिकदृष्ट्याही हर्ट करू शकते.

How to know that you are ready for sex | लैंगिक जीवन : तुम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहात की नाही? असे जाणून घ्या

लैंगिक जीवन : तुम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहात की नाही? असे जाणून घ्या

Next

कपलमध्ये फिजिकल इन्टमेसी फिल होणे सामान्य बाब आहे. सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये घाई करणे शारीरिकसोबतच भावनिकदृष्ट्याही हर्ट करू शकते. अशात सर्वातआधी हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते की, तुम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहात की नाही. 

नात्याची मजबूती

जर तुम्हाला नातं पुढच्या पायरीवर घेऊन जायचं असेल तर आधी तुमचं नातं किती घट्ट आहे हे जाणून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्यात अजून हवा तितका इमोशनल बॉन्ड मजबूत झाला नाही, तर आधी त्यावर  काम करायला हवं. हे विसरू नका की, शारीरि संबंध यात केवळ दोन शरीरच नाही तर भावनांचाही समावेश असतो. 

हे जाणून घ्या

सेक्शुअल रिलेशनशिपआधी सेक्सबाबत जाणून घ्या. आजकाल इंटरनेटवरही याबाबत भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण ती बरोबर असेलच असं नाही. त्यामुळे योग्य माहिती मिळवा. एखादा अनुभवी व्यक्ती याबाबत तुम्हाला अधिक चांगलं सांगू शकेल. आधी शारीरिक संबंध आणि त्यानंतर त्याचे परिणाम याबाबत जाणून घ्या. नंतरच या गोष्टीचा निर्णय घ्या.

नशेत काही नका करू

मद्यसेवन किंवा इतर कोणत्या पदार्थांची नशा केली असेल तर शारीरिक संबंध अजिबात ठेवू नका. कारण अशा स्थितीत तुम्ही योग्य विचार करण्याच्या स्थितीत नसता. असंही होऊ शकतं की, दोघांनाही भानावर आल्यावर पश्चाताप होईल. 

पार्टनर विश्वास

तुमचा पार्टनर विश्वास आहे का? हा विश्वास इतका आहे का की, तुम्ही तुमच्या नात्याला पुढच्या पायरीवर घेऊन जाऊ शकता. याचा विचार करून काय उत्तर मिळतं, तो निर्णय घ्या. उगाच सगळे करतात किंवा कुणी म्हणतं म्हणून या गोष्टीच्या मागे लागू नका. याने दोघांनाही मानसिक त्रास होऊ शकतो. 

स्वत:साठी निर्णय घ्या

कपल्समध्ये अशी स्थिती येऊ शकते की, दोघांपैकी एक शारीरिक संबंधासाठी तयार असू शकतो तर दुसरा याबाबत तयार नसेल. असं असेल तर चुकूनही एकाने दुसऱ्याला फोर्स करू नये. शारीरिक संबंध हा केवळ दुसऱ्याच्या आनंदासाठी असू शकत नाही. ज्याप्रकारे नातं ठेवण्याचा निर्णय दोघांचा होता तसा यातही निर्णय दोघांचा असावा. कुण्या एकाचा नाही.
 

Web Title: How to know that you are ready for sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.