अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:41 PM2019-03-12T15:41:50+5:302019-03-12T15:42:05+5:30

आता अंतराळावीरांसोबतच सामान्य लोकांनाही अंतराळात घेऊन जाण्याची तयारी केली जात आहे. अंतराळात वस्ती वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

How does one have sex in space former NASA chief answers | अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर?

अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर?

googlenewsNext

आता अंतराळावीरांसोबतच सामान्य लोकांनाही अंतराळात घेऊन जाण्याची तयारी केली जात आहे. अंतराळात वस्ती वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि अंतराळ प्रवासाचा खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेत तर प्रायव्हेट कंपन्या सर्वसामान्य लोकांना अंतराळात फिरायला घेऊन जाण्याची तयारी करीत आहेत. या सर्वात एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जेव्हा मनुष्य अंतराळात राहण्याची तयारी करू लागतील तेव्हा अंतराळात ते पृथ्वीवर करत असलेली सर्वच कामे करू शकतील का? यात शारीरिक संबंधा याचाही समावेश आहे. 

शारीरिक संबंधावरही उपाय शोधला जाईल

एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत एका वृत्तावाहिनीला अमेरिका स्पेस रिसर्च एजन्सी नासाचे माजी प्रमुख मेजर जनरल चार्ल्स फ्रॅंक बोल्डन ज्यूनिअर यांनी सांगितले की, अंतराळात काहीही करण्याची कोणतीही वेगळी पद्धत नाही. पृथ्वी ज्या गोष्टी जशा आपण करतो तशाच तिथेही केल्या जातात. फरक फक्त इतकाच आहे की, तिथे ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरूत्वाकर्षण नसतं. त्यामुळे शरीरावर कंट्रोल ठेवणं कठीण होतं. अशात अंतराळात स्वत:ला स्थिर ठेवणं सर्वात गरजेचं असतं. चार्ल्स म्हणाले की, याबाबत अजूनतरी फार रिसर्च करण्यात आलं नाही. पण मला आशा आहे की, भविष्यात अंतराळात जाणारे लोक इतर कामांसारखाच शारीरिक संबंधाचीही पद्धत शोधून काढतील.

अशक्य नाही अंतराळ शारीरिक संबंध

नासाचे दुसरे एक वैज्ञानिक जॉन मिलिस यांनी सांगितले की, अंतराळात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे स्कायडायव्हींग करताना इंटरकोर्स करणे. यादरम्यान प्रत्येक पुस किंवा थ्रस्ट पार्टनरला तुमच्या जवळ आणण्याऐवजी तुमच्या विरूद्ध दिशेने ढकलेल. अंतराळा दोन्ही व्यक्ती योग्य पद्धतीने बांधलेले नसतील तर साधा धक्काही दोघांना एकमेकांसोबत उभं राहण्यास अडचणी निर्माण करू शकतो. पण याचा अर्थ हा नाही की, अंतराळात शारीरिक संबंध ठेवणे अशक्य आहे. 

डोक्याच्या दिशेने वाहतं रक्त

मिलिस सांगतात की, गुरूत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणी व्यक्तीच्या शरीरातील रक्त हे शरीराच्या खालच्या दिशेने नाही तर डोक्याचा दिशेने जास्त जातं. त्यामुळे महिला आणि पुरूष दोघांसाठीही उत्तेजना जाणवणे कठीण काम आहे. सोबतच अंतराळाच मेल टेस्टोस्टेरॉन लेव्हलही वेगाने कमी होऊ लागते आणि अंतराळात जाणाऱ्या अंतराळावीरांमध्ये सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होऊ लागते. 

Web Title: How does one have sex in space former NASA chief answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.