टिकवायचीय कामेच्छा? मग नियंत्रणात ठेवा आवडते पदार्थ खाण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:53 PM2019-05-21T16:53:06+5:302019-05-21T16:53:30+5:30

जेव्हाही तुम्ही शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेता तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला नेहमीच असं उत्तर देतो का? की आज मूड नाही!.

Foods that kill your sex drive, avoid these foods | टिकवायचीय कामेच्छा? मग नियंत्रणात ठेवा आवडते पदार्थ खाण्याची इच्छा

टिकवायचीय कामेच्छा? मग नियंत्रणात ठेवा आवडते पदार्थ खाण्याची इच्छा

जेव्हाही तुम्ही शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेता तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला नेहमीच असं उत्तर देतो का? की आज मूड नाही!. असंही होऊ शकतं की, ते थकवा, पुरेशी झोप न होणे या गोष्टींची कारणे सांगत असतील. पण त्यांच्या या उत्तराचं कारण त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही असू शकतं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, खाण्या-पिण्याच्या काही गोष्टींमुळे हार्मोनल लेव्हलवर परिणाम होतो. ज्यामुळे कामेच्छा कमी होऊ शकते. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या गोष्टी....

अल्कोहोल

जास्त अल्कोहोल सेवन केल्याने लिव्हर खराब होतं, हे सर्वांनाच माहीत आहे. पण हेही तितकंच खरं आहे की, अधिक अल्कोहोल सेवनामुळे लैंगिक जीवनही प्रभावित होतं. जर तुमचं लिव्हर कमजोर झालं असेल तर ऐंड्रोजेन ऐस्ट्रोजेनमध्ये रूपांतरित होतं आणि याने शारीरिक संबंधाची इच्छा कमी होते. अल्कोहोलचं जास्त सेवन केल्यास पुरूषांना स्खलन कंट्रोल करण्यास अडचण येते. तसेच अल्कोहोलमुळे महिलांच्या फर्टिलिटीवरही प्रभाव पडतो. त्यामुळे मद्यसेवन करून तुम्ही कामेच्छा वाढण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. 

प्रोसेस्ड फूड

Sexual Life: Why does women increase the vaginal dryness at age 30-40 know more reasons | लैंगिक जीवन : ३०-४० वयाच्या महिलांमध्ये वाढते

कुकीज, बिस्किट्स आणि सर्वच प्रकारचे प्रोसेस्ड फूड कामेच्छा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. प्रोसेसिंगमध्ये वापरली जाणारी स्ट्रिप्स पोषक तत्त्वांना नष्ट करते. कामेच्छा वाढवणारे अनेक तत्त्व यामुळे नष्ट होतात. उदाहरणार्थ गहू प्रोसेस करून पीठ तयार केलं जातं. तेव्हा यातील झिंकचं प्रमाण कमी होतं. जे कामेच्छा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं तत्त्व आहे. 

शुगर

Sexual Life: Tips for post delivery sex | लैंगिक जीवन : प्रसूतीनंतर

भलेही तुम्ही चहा किंवा कॉफीमध्ये साखर घेत नसाल. पण जास्तीत जास्त फूड आयटम्समध्ये भरपूर प्रमाणात शुगर लपलेली असते. सोडा असलेली कॅफिनेटेड आणि शुगर ड्रिंक्स इत्यादीचं अधिक सेवन केल्याने शरीरासोबतच कामेच्छेवरही प्रभाव पडतो. तसेच ब्लड शुगर लेव्हलही वाढते, ज्यामुळे कामेच्छा कमी होते. 

कॅन्ड फूड 

कॅन्ड फूड म्हणजे डबाबंद खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आणि जास्त दिव प्रिजर्व्ह करण्यासाठी यात डायटरी सोडियमचं प्रमाण अधिक असतं. याने ब्लड प्रेशर वाढतं आणि शरीराच्या अनेक अवयवांना कमी रक्त पुरवठा होतो. शरीराच्या मुख्य अवयवांमध्ये रक्त कमी झाल्याने कामेच्छा कमी होते. 

मसालेदार पदार्थ

जर तुम्ही मसालेदार रस्सा आणि लोणचं खाण्याचे शौकीन असाल तर हे पदार्थ खाणं कमी करावं. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने प्रायव्हेट पार्टच्या स्मेलवर प्रभाव पडतो. हे टाळायचं असेल तर मसालेदार आणि सुगंधित पदार्थ खाणं कमी करा.

Web Title: Foods that kill your sex drive, avoid these foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.