लैंगिक जीवनाच्या 'या' ५ गोष्टी प्रत्येक जोडप्याला माहीत असाव्यात, नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:09 PM2019-02-19T16:09:06+5:302019-02-19T16:09:43+5:30

शारीरिक संबंधाबाबत आपल्या समाजात आजही फार कमी लोक मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या लैंगिक जीवनातील समस्या किंवा अडचणी तशाच राहतात.

Five things related to sex education which every couple should know | लैंगिक जीवनाच्या 'या' ५ गोष्टी प्रत्येक जोडप्याला माहीत असाव्यात, नाही तर...

लैंगिक जीवनाच्या 'या' ५ गोष्टी प्रत्येक जोडप्याला माहीत असाव्यात, नाही तर...

googlenewsNext

शारीरिक संबंधाबाबत आपल्या समाजात आजही फार कमी लोक मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या लैंगिक जीवनातील समस्या किंवा अडचणी तशाच राहतात. काही लोक मात्र मॅगझिन आणि मित्रांच्या गॉसिप्समधून त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. पण खरंतर गरज त्यांना चांगल्या आणि योग्य लैंगिक शिक्षणाची असते. अशाच पाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या प्रत्येक जोडप्याला माहीत असायला हव्यात.  

हे आहे समस्येचं कारण

अनेकजण त्यांच्या लैंगिक आयुष्याबाबत, शारीरिक संबंधातील कमतरतेमुळे फार जास्त तणावात असतात. पण त्यांनी त्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा संतुष्टीसाठी जी पावले उचलायला हवीत त्याबाबत ते फार उदासीन असतात. त्यांच्या मनातील प्रश्नांचं योग्य उत्तर मिळवण्यासाठी ते योग्य व्यक्तीला संपर्क करण्याऐवजी मित्रांशी बोलता, गॉसिप करतात आणि अनेकदा ऑनलाइन पॉर्नच्या जाळ्यातही अडकतात. सत्य हेच आहे की, जास्तीत जास्त लोक जे लैंगिक तज्ज्ञांकडे जातात, त्यांना लैंगिक जीवनात फार समस्या नसतात. पण जे जात नाहीत त्यांच्या डोक्यात अनेक गैरसमज घर करून असतात.

जवळीकता गरजेची

ही तक्रार करणारे जास्तीत जास्त कपल्स हे ३० ते ४० वयोगटातील असतात. तसे हे लोक हेल्दी असतात, पण त्यांच्या जवळीकतेची कमतरता असते. या लोकांची समस्या ही असते की, ते त्यांचं लैंगिक जीवनाची मित्रांसोबत, मॅगझिनमध्ये वाचतात त्या लोकांशी तुलना करू लागतात. पण असं न करता त्यांनी त्यांच्या लैंगिक जीवनातील अडचणीचं कारण शोधायला हवं. जर हेल्थशी संबंधित मुद्दे असतील तर त्यावर औषधांनी उपाय करा आणि जर नात्याशी संबंधित मुद्दा असेल तर काउन्सेलिंगच्या माध्यमातून सोडवा. अनेकदा काही कपल्स हे काम, स्मार्टफोन आणि जबाबदऱ्यांमध्ये इतके बिझी होतात की, ते सोबत क्वालिटी वेळ घालवू शकत नाहीत. तुम्हाला जर मुख्य कारण समजलं जर तुम्ही त्यावर तोडगा काढू शकता. 

४० वयानंतर येणाऱ्या समस्या

४० किंवा ५० वयोगटातील अनेक लोक हे बेडरूममध्ये चांगलं परफॉर्म नाहीत करू शकत. कारण त्यांचं शरीर शारीरिक संबंध ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नसतं. ते डायबिटीस, हायपरटेंशन आणि जाडेपणाचे शिकार झालेले असतात आणि ते यावर अजिबात लक्ष देत नाहीत. आकडेवारी बघायची तर ४० वयाच्या वरचे साधारण ५० टक्के पुरूष हे इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या समस्येने हैराण झालेले असतात. अशात जेव्हा ते परफॉर्म करू शकत नाही, त्याला ते त्यांची कमजोरी मानू लागतात. इतकेच नाही तर त्यांची पार्टनर त्यांच्याबाबत काय विचार करत असेल या विचारानेही काही पुरूष खचलेले असतात. मात्र खरंतर हे आहे की, कोणतीही व्यक्ती सगळंकाही ठिक असेल तर ९० वयापर्यंतही शारीरिक संबंध ठेवू शकता. त्यामुळे पुरूषांनी हे ध्यानात घ्यायला पाहिजे की, प्रीमच्योर इजॅक्यूलेशन हा काही आजार नाहीये, ही एक बिहेविअर संबंधी समस्या आहे. जी सोडवली जाऊ शकते. 

फॅंटसी

सामान्यपणे कमिटेड रिलेशनशिपमध्ये दुसऱ्याबाबत फॅंटसाइज करणे म्हणजे शारीरिक संबंधावेळी दुसऱ्या व्यक्तीची कल्पना करणे याला संशय आणि अपराधी भावनेने पाहिले जाते. लोकांची अशी धारणा असते की, दुसऱ्यांबाबत सेक्शुअली विचार करणे हे दगा देणं आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे सेक्शुअली अट्रॅक्ट होणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. एका व्यक्तीसोबत नात्यात राहणे ही आपली चॉइस आहे असहायता नाही. संशय आणि इर्षेच्या भावनेने स्वत:ला दुखवून घेण्यापेक्षा तुमच्या इच्छांबाबत जोडीदारीशी मोकळेपणाने बोला. 

लैंगिक क्रियेची स्पर्धा नको

नवीन जोडप्यांमध्ये असुरक्षा, अस्वस्थता, अतिसंवेदनशीलता या भावना फार जास्त बघायला मिळतात. खासकरून हे तेव्हा होतं जेव्हा कपल्सपैकी कुणा एकाचा सेक्शुअल भूतकाळ राहिलाय. याप्रकारच्या असुरक्षेच्या भावनेमुळे महिला कॉस्मेटिक सर्जरी करून ब्रेस्ट आणि बट एन्लार्ज करवून घेतात. तसेच जेनिटल एरियाचंही ब्यूटिफिकेशन करतात. तेच पुरूषांमध्ये यामुळे परफॉर्मंस एंग्जायटीची समस्या होते. मात्र दोघांनीही हे समजून घ्यायला हवं की, चांगले शारीरिक संबंध शारीरिक आकारावर नाही तर जवळीकता आणि सहजता यावर अवलंबून असतात. तुमचा पार्टनर तुमच्यासोबत आहे कारण तो तुम्हाला पसंत आहे. त्यामुळे तुलना करण्यापेक्षा बेडरूम स्कील्स चांगले करण्यावर भर द्यावा. 

Web Title: Five things related to sex education which every couple should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.