लैंगिक जीवन : भांडणानंतरचा शरीरसंबंध देईल वेगळाच आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 03:42 PM2019-01-18T15:42:48+5:302019-01-18T15:43:13+5:30

कोणतंही नातं चांगलं, आनंदी ठेवण्यासाठी त्या नात्यात भांडणाला काही जागा नसते. पण जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा काहीना काही कारणावरून भांडण होतच असतं.

Fight with your partner first only to have makeup sex | लैंगिक जीवन : भांडणानंतरचा शरीरसंबंध देईल वेगळाच आनंद

लैंगिक जीवन : भांडणानंतरचा शरीरसंबंध देईल वेगळाच आनंद

googlenewsNext

कोणतंही नातं चांगलं, आनंदी ठेवण्यासाठी त्या नात्यात भांडणाला काही जागा नसते. पण जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा काहीना काही कारणावरून भांडण होतच असतं. भांडण झालं की, दोघेही रागाने वेगवेगळ्या दिशांना तोंड करून झोपतात. पण दोघांमध्ये होणारा हा वाद-विवाद किंवा भांडण एका चांगल्या लैंगिक क्रियेची सुरुवात ठरू शकतं, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? म्हणजे भांडणानंतर ठेवले जाणारे शारीरिक संबंध. अशाप्रकारे ठेवलेल्या शारीरिक संबंधाला मेकअप सेक्स असं म्हटलं जातं. रोज एकच एक गोष्ट करून कंटाळलेल्या जोडप्यांनी ही नवी पद्धत वापरल्यास त्यांच्या लैंगिक जीवनात एक नवा रोमांच येण्यास मदत होऊ शकते. 

तज्ज्ञ सांगतात की, भांडणं आणि काही गोष्टींवरुन होणारी बाचाबाची काही जोडप्यांसाठी व्हर्बल फोरप्लेसारखं काम करते. तुम्ही काही सिनेमांमध्येही पाहिलं असेल की, हिरोईन हिरोला म्हणजे 'तू रागावलास की जास्त चांगला दिसतो'. तुम्हीही त्यातलेच असाल आणि कधी कधी भांडण करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली आयडिया ठरु शकते. पण यासाठी तुम्हाला भांडण करावं लागेल. मग तुम्ही कशावरुनही भांडू शकता. त्यात घरखर्चापासून ते वाढदिवसाची तारीख विसरणे असे विषय असू शकतात. एकमेकांवर ओरडा, एकमेकांना धक्का द्या आणि यातून लाडीक जोर-जबरदस्तीने तुम्ही लैंगिक क्रियेला सुरुवात करु शकता. 

जेव्हा तुम्हाला वाटेल की, या भांडणात तुम्ही हरणार आहात तेव्हा जोडीदाराचं चुंबन घ्या, जोडीदाराला घट्ट मिठी मारा. या प्रेमाच्या आणि ठरवून केलेल्या जोरजबरदस्तीतही एक वेगळाच आनंद असतो. असे केल्याने शरीरातील रक्ताचा प्रवाह आधीच वाढलेला असतो. त्यामुळे ही लैंगिक क्रिया नेहमीपेक्षा वेगळी आणि अधिक आनंद देणारी ठरू शकते. मात्र यासाठी तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागतो. म्हणजे खोट्या किंवा गमतीच्या भांडणाला तुम्हाला एका आनंददायी लैंगिक क्रियेत रुपांतरित करायचं आहे. 

यात राग आल्याचं नाटक करून एकमेकांना चिडवण्याचा, धक्के देण्याचा, एकमेकांना मारण्याचा, एकमेकांना मिठी घेण्याचाही समावेश असतो. पण हे करत असताना खरं असू नये. राग आल्याचं आणि भांडण करत असल्याचं तुम्हाला केवळ नाटक करायचं आहे. खरं तर हे वाचायला तुम्हाला विचित्र आणि मूर्खपणाचं वाटत असेल. पण अनेक सर्वेंमध्ये जोडप्यांनी त्यांना मेकअप सेक्स आवडत असल्याचं म्हटलं आहे. 

टिप: हे भांडण आणि राग केवळ नाटक असावं. त्यात भावनिक मुद्दा आणू नका. पर्सनली घेऊ नका. तसं झालं तर हे भांडण आणि रात्र तुम्हाला भारी पडू शकते. 
 

Web Title: Fight with your partner first only to have makeup sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.