लैंगिक जीवन : पहिल्यांदा असते 'या' गोष्टींची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:46 PM2018-11-12T15:46:43+5:302018-11-12T15:47:17+5:30

शारीरिक संबंध ही नैसर्गिक आणि हवीहवीशी वाटणारी क्रिया असली तरी याबाबत अनेक समज-गैरसमज अनेकांमध्ये असतात.

Does it hurts to women in first time | लैंगिक जीवन : पहिल्यांदा असते 'या' गोष्टींची भीती!

लैंगिक जीवन : पहिल्यांदा असते 'या' गोष्टींची भीती!

Next

शारीरिक संबंध ही नैसर्गिक आणि हवीहवीशी वाटणारी क्रिया असली तरी याबाबत अनेक समज-गैरसमज अनेकांमध्ये असतात. पुरेसं लैंगिक शिक्षण मिळत नसल्याने याबाबत अनेक गोष्टींची भीती सतावत असते. ही भीती पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना पती-पत्नींमध्ये असते. अनेक प्रश्न, अनेक शंका-कुशंका, न्यूनगंड, वेदनांची भीती अशी पहिल्यावेळी स्थिती झालेली असते. अशात मुलींना अधिक जास्त भीती वाटत असते. चला जाणून घेऊ याबाबतचं सत्य...

तज्ज्ञ सांगतात की, वेदना कमी होवोत अथवा जास्त मुलींनी आधीपासूनच व्हर्जिनिटीबाबत इतकं ऐकलेलं असतं की, त्यांच्या मनात एक भीती दडलेली असते. अशावेळी दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना सहज करणं महत्त्वाचं असतं. जेणेकरुन दोघांचीही भीती आणि अवघडलेपण निघून जाईल.  

रक्तस्त्रावाची भीती

महिलांना आधीपासूनच हे सांगितलं गेलेलं असतं की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना रक्त येतं. पण हे प्रत्येकांबाबत असं होईल हे गरजेचं नाहीये. या भीतीने केवळ त्रास वाढतो, बाकी काही नाही. 

ल्यूब्रिकेशनचा अभाव

दोन शरीर एकत्र येण्याआधी प्रणय करणं फार गरजेचं असतं. याने शारीरिक संबंध ठेवण्यास मदत होते. प्रणय केल्याने गुप्तांगातील ओलावा वाढतो आणि याने घर्षणाची समस्या होत नाही. तसेच ल्यूब्रिकेशन नसेल तर वेदनांचा सामना करावा लागू शकतो. 

जास्त आवेग

जर तुमचा जोडीदार फार आवेगाने जोर लावून ही प्रक्रिया करीत असेल त्याला शांत होण्यास सांगा. काहींचा उत्साह अधिक असतो अशात ते समोरच्या व्यक्तींचा विचारच करत नाहीत. अशात दुसऱ्याला याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. 

तर मजा नाही

जर मानसिक रुपाने शांत आणि तयार नसाल तर तुम्ही लैंगिक क्रियेचा मनमुराद आनंद घेऊ शकणार नाहीत. मनाविरुद्ध ही गोष्ट होत असेल तर याचा त्रासच होतो. त्यामुळे ही मनाची तयारी असेल तेव्हाच यासाठी पाऊल पुढे टाका.

Web Title: Does it hurts to women in first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.