लैंगिक जीवन : काय पुरुषही महिलांप्रमाणे 'त्या' गोष्टीची अॅक्टिंग करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:26 PM2018-12-11T16:26:10+5:302018-12-11T16:26:43+5:30

पुरुषही परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात. पुरुष असं आपल्या कल्पनेपेक्षाही जास्तवेळा करतात.  

Do men also pretence of false orgasm | लैंगिक जीवन : काय पुरुषही महिलांप्रमाणे 'त्या' गोष्टीची अॅक्टिंग करतात?

लैंगिक जीवन : काय पुरुषही महिलांप्रमाणे 'त्या' गोष्टीची अॅक्टिंग करतात?

Next

वेगवेगळ्या शोधानुसार असं मानलं जात होतं की, महिला आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी त्यांना शारीरिक संबंधादरम्यान परमोच्च आनंद(ऑर्गॅज्म) मिळत असल्याचं खोटं खोटं भासवतात. पण आता याची दुसरी बाजूही समोर आली आहे. पुरुषही परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात. पुरुष असं आपल्या कल्पनेपेक्षाही जास्तवेळा करतात.  

काय सांगतो शोध

अमेरिकेच्या कॅन्सास यूनिव्हर्सिटीमध्ये २०११ मध्ये २०० पुरुषांवर एक सर्वे करण्यात आला. यातील २५ टक्के पुरुषांनी(50 टक्के महिलांच्या तुलनेत) मान्य केले की, ते शारीरिक संबंधादरम्यान परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात. 

काय आहे असं करण्याचं कारण?

याचं कारण म्हणजे त्यांना जेव्हा असं वाटतं की, ते परमोच्च आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा पुरुष असं करतात. जेव्हा शारीरिक संबंधाला जास्त वेळ लागत असेल किंवा त्यांना हे क्रिया लवकर संपवायची असेल तेव्हाही ते परमोच्च आनंद मिळल्याचं खोटं खोटं भासवतात. 

वाढू शकतो तणाव

एक्सपर्ट सांगतात की, 'पुरुषांकडून असं केलं जाण्याची कारणं महिलांच्या कारणांप्रमाणेच आहेत. पण एकीकडे महिला याचा स्पष्टपणे स्विकार करताना दिसतात. पण पुरुष सहजपणे याचा स्विकार करत नाहीत. कारण त्यांच्यावर प्रदर्शनाचा दबाव असतो आणि हेच त्यांच्या तणावाचं कारण असतं. 

औषधांचेही होतात दुष्परिणाम

जास्त तणावात राहणाऱ्या किंवा औषधांचं जास्त सेवन करणाऱ्या पुरुषांना प्रणय क्रियेचा शेवट करण्यास उशीर लागणे ही समस्या होऊ शकते. तेच याची काही दुसरीही कारणे आहेत. जोडीदाराबाबत आकर्षण न वाटणं, शारीरिक संबंधांचा कंटाळा येणं यामुळेही पुरुष असं करतात. अनेक पुरुषांना आपल्या जोडीदाराला दुखवायचं नसतं, म्हणूनही ते असं खोटं भासवतात. 

Web Title: Do men also pretence of false orgasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.