‘झिरो’ बनला वसूलदार नंबर वन: ऐकावं ते नवलच :तर काय करेल ‘वर्दी’

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:03am

कºहाड : खाकीतले पोलिस खरे ‘हिरो’; पण सध्या कºहाडात सिव्हिल ड्रेसवर ‘झिरो’ पोलिस चक्क ‘हिरोगिरी’ करतायत. चारचौघांत कॉलर टाईट करून ऐट मारतायत.

संजय पाटील । कºहाड : खाकीतले पोलिस खरे ‘हिरो’; पण सध्या कºहाडात सिव्हिल ड्रेसवर ‘झिरो’ पोलिस चक्क ‘हिरोगिरी’ करतायत. चारचौघांत कॉलर टाईट करून ऐट मारतायत. एवढच नव्हे तर ठराविक ट्रॅफिकवाल्यांच्या छायेत त्यांचा वावरही वाढलाय. ट्रॅफिकवाले कुरवाळत असल्याने रस्त्यावर उभं राहून वाहनं अडविण्यापर्यंत मजल गेलीय.

कºहाडची वाहतूक शाखा म्हणजे ‘आधे इधर, आधे उधर’चा ‘ड्रामा’. शाखेत तब्बल चाळीस कर्मचारी काम करतात; पण बºयाचवेळा ‘पॉर्इंट’वर नेमण्यासाठी कर्मचारी शोधण्याची वेळ येते. काहीजण सुटीवर तर काहीजण रजेवर गेल्यास शाखेच्या अधिकाºयांना कर्मचारी आणि पॉर्इंटचा ताळमेळ घालत कसरत करावी लागते. त्यातच काही कर्मचाºयांची हुशारी अधिकाºयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची परिस्थिती आहे. वास्तविक, या शाखेचे अधिकारी सरळमार्गी. वाळल्या पाचोळ्यावर पाय पडला तर दिलगिरी दाखविणारे. काम भलं अन् आपण, असा त्यांचा शिरस्ता; पण अधिकाºयाच्या या मवाळ धोरणानेच काही कर्मचारी सुस्तावलेत. ‘ड्युटी’वर असतानाही ते झिरो पोलिसाला कामाला लावून स्वत: पावत्यांमध्ये व्यस्त असतात. ‘झिरो’ पोलिसाने वाहने आडवायची आणि साहेबांनी अथवा मॅडमनी पावती करायची, असा नवा पायंडा हे कर्मचारी पाडतायत. याबरोबरच ‘बुलेट’वाल्या आणि ‘पाटील’की करणाºया कर्मचाºयांची संख्याही वाढताना दिसतेय.

झिरो पोलिस हे पात्र कºहाडकरांसाठी नवीनच. यापूर्वी असा स्वयंघोषित पोलिस असतो, हेच जनतेला माहिती नव्हतं. मात्र, सध्या वेगवेगळ्या कारणानं ‘झिरो पोलिस’ हे नाव प्रत्येकाच्या कानी पडतय. त्यामुळे ट्रॅफिकवाल्यांसोबत फिरणाºयांकडे अनेकांची नजर वळलीय. वाहतूक शाखेतल्या काही ‘खास’ कर्मचाºयांसोबत सध्या असे ‘झिरो पोलिस’ फिरतायत. वारंवार पोलिस ठाण्यात वावरणे, अधिकारी तसेच कर्मचाºयांसोबत राहणे, गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फौजदारकी करणे, सर्वांसमोर अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावून रुबाब झाडणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. कुणावर निव्वळ कारवाई करायची, कुणाला दंड करायचा आणि कुणावर खटला भरायचा? हे ‘झिरो पोलिसा’च्या इशाºयावर होत असल्याचे वडापवाले सांगतायत. ‘अप्पा’से डर लगता है साहब कºहाड शहरासह तालुक्यातील वडापवाले एकवेळ ट्रॅफिक हवालदाराला घाबरणार नाहीत; पण ‘अप्पा’पासून चार हात लांब राहतात. पूर्वी एकाच अप्पाची वडापवाल्यांसोबत उठबस असायची. तोच पोलिस आणि वडापवाल्यांमध्ये मध्यस्थी करतानाही दिसायचा. मात्र, सध्या आणखी एका अप्पाची ‘एन्ट्री’ झालीय. या दोन अप्पांची सध्या वडापवाल्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ‘झिरो पोलिस’ म्हणून हे ‘अप्पा’ ट्रॅफिकवाल्यांसोबत फुशारक्या मारताना दिसतायत. एवढेच नव्हे तर एक अप्पा रस्त्यावर उभं राहून काहीवेळा वाहनही अडवतो. आणि ट्रॅफिकवाल्या मॅडम त्याचं समर्थन करतात, हे विशेष. ‘हे’ वेगळे, आणि ‘ते’ वेगळे! कºहाड शहर पोलिस ठाण्यात ‘माऊली’ आणि ‘महाराज’ यांचाही वावर आहे. मात्र, या दोघांकडून पोलिसांना मदतच होते. हे दोघेही प्रामाणिकपणे पोलिसांसोबत सेवा करतात; पण फक्त ट्रॅफिकवाल्यांशी जवळीक साधून खिसे गरम करण्याचा काहींचा उद्योग आहे. वडापवाल्यांवर खुन्नस ठेवायची, जवळच्या ट्रॅफिकवाल्याला ‘टीप’ देऊन त्याच्यावर कारवाई करायला लावायची, मॅडमना मदत करण्याच्या नावाखाली वाहने अडवायची आणि त्यातून ‘झिरो पोलिस’ असल्याची ऐट मारायची, असा त्यांचा एककलमी कारभार सुरू आहे. ‘झिरो पोलिस’ म्हणजे काय? छापा कारवाईसह अन्य कारणास्तव पोलिसांना वारंवार पंच, साक्षीदारांची गरज भासते. ऐनवेळी असे पंच आणि साक्षीदार उभे करताना पोलिसांची धावपळ होते. त्यामुळे ठराविक काहीजणांशी पोलिस कायम संपर्कात असतात. तसेच संबंधित व्यक्तीही कायम पोलिस अधिकारी किंवा कर्मचाºयांसोबत वावरते. अशा व्यक्तींचा अनेकवेळा पोलिसांना फायदाही होतो. संबंधिताला कसलेही अधिकार नसले तरी पोलिसांसोबत वावर असल्यामुळे आपोआपच त्याचा रुबाब तयार होतो. अशांना ‘झिरो पोलिस’ म्हटले जाते. झिरो पोलिसाचा पद्धतशीरपणे वापर सातारा : शहर पोलिस ठाण्यामध्येही एका झिरो पोलिसाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण केली जाते. जनता आणि पोलिसांमधील वसुलीचा दुवा असणाºया या झिरो पोलिसाचा पोलिस पद्धतशीरपणे वापर करून घेतात. सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये एक झिरो पोलिस कार्यरत आहे. एका शाखेमध्ये म्हणे तीन झिरो पोलिस आहेत. या पोलिसांचे काम केवळ वसुलीच असते. खबºया कमी वसुलीच जास्त, अशी अवस्था असणाºया या झिरो पोलिसांचा रुबाबही खºयाखुºया पोलिसांसारखाच असतो. जी सर, जयहिंद, हे शब्द त्याच्या तोंडावर सराईतपणे येत असतात. शहर पोलिस ठाण्यात असलेला झिरो पोलिसही असाच आहे. वार्धक्याकडे झुकलेल्या या झिरो पोलिसाला दादा, अप्पा म्हणून पोलिस हाक मारत असतात. अधिकाºयांची घरगुती कामे करण्यापासून ते वसुली करण्यापर्यंत सगळी कामे हा झिरो पोलिस करत असतो. एका शाखेत म्हणे तीन झिरो पोलिस आहेत. मात्र, हे पोलिस शाखेत फारसे नसतात. फोनवरून कामे करण्यात हे अप्पा, दादा म्हणे पटाईत आहेत. त्यामुळे या शाखेत येणाºया प्रत्येक प्रकरणाची गोपनीयता राखली जाते.

संबंधित

बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश
भीमा हाटे मृत्युप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्या
मोबाईल चोरणारी लेडीज गॅंग जेरबंद 
अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 
भद्रकालीतील लॉजवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

सातारा कडून आणखी

हिरवा निसर्ग भोवतीने... साताऱ्यांतील सव्वाशे विद्यार्थ्यांची अजिंक्यताऱ्यावर वर्षासहल
सातारा : मोबाईल असोसिएशनचा पोलीस ठाण्यावर मोर्चा, चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
कोयना धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरला
Milk Supply मंदिरात युवकांनी केली दुधाने अंघोळ, आंदोलनाची धग कायम
सातारा : राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर फसवणुकीचा गुन्हा

आणखी वाचा