यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:57 PM2018-07-15T22:57:42+5:302018-07-15T22:57:54+5:30

This year Ganesh festival is free of thermocol; Shot of Traders | यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

Next

सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी न्यायालयाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले आहे.
राज्य शासनाने २३ जूनपासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. या निर्णयाची प्रशासनाकडून सर्वत्र काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करून दुकानदार व व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाने केलेल्या या कारवाईची धास्ती घेऊन दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला असला तरी थर्माकोलला या बंदीतून सूट द्यावी, अशी मागणी थर्माकोल फॅब्रिकेटर आणि डेकोरेशन समितीने उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवल्याने याचा मोठा फटका व्यापाºयांना बसला आहे.
पूर्वी गणपती प्रतिष्ठापनेसाठी घरीच सजावट केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून थर्माकोलपासून बनविण्यात येणारी आसने, लायटिंगचे मंदिर, सिंहासन, पालखी अशा विविध आरास साहित्याची मागणी गणेश मंडळांकडून होऊ लागली आहे. गणेशोत्सवाच्या एक-दोन महिने अगोदर थर्माकोलचा वापर करून मकर व इतर वस्तू तयार केल्या जातात. उत्सवकाळात सजावटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गणेशोत्सवात थर्माकोलच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा थर्माकोल बंदीमुळे ही उलाढाल थांबणार असून, पूर्वीप्रमाणेचे पारंपरिक रंगबिरंगी पडदे, कागद व लाकडापासून बनविल्या जाणाºया शोभिवंत वस्तूंना मागणी वाढणार आहे.
हे आहेत तोटे...
थर्माकोल हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे.
त्याचे लवकर विघटन होत नाही.
पर्यावरणासाठी हा अत्यंत घातक घटक आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.
जलस्त्रोतांवरही विपरित परिणाम होतो.
थर्माकोल जळाल्यानंतर निघणारा वायू हा घातक असतो.
या वायूचा ओझोनवरही परिणाम होता.

Web Title: This year Ganesh festival is free of thermocol; Shot of Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.