धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:54 AM2019-01-12T00:54:01+5:302019-01-12T00:55:40+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ...

 Welcome to the birth of daughter in Dhangarwadi: If you plant the tree, then deposit upto 30 thousand rupees | धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

Next
ठळक मुद्देकेंद्र्रीय पथकाने धनगरवाडी गावाची पाहणी करून गावाने राबवलेली योजना व कामाचे कौतुक केले.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष योजना हाती घेतली आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर वृक्षलागवड व संवर्धन केल्यास मुलीच्या नावे १५ ते ३० हजारांपर्यंत ठेव पावती केली जाणार आहे,’ अशी माहिती सरपंच चंद्र्रकांत पाचे यांनी दिली.

धनगरवाडी गाव आदर्श बनविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक शनिवार हा गावचा स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करतात. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ते सुंदर करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी नवी योजना आखलीआहे. एखाद्या दाम्पत्याला पहिली मुलगी जन्माला आली तर त्यांनी गावच्या परिसरात दहा झाडे लावून ती जगवायची, असे केल्यास मुलीच्या नावे ग्रामपंचायत १५ हजारांची ठेव पावती करणार आहे तर दुसºया मुलीच्या जन्मावेळी वीस झाडे जगवल्यास ३० हजारांची ठेव पावती केली जाणार आहे. जे दाम्पत् एकाच मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार आहे. त्यांना ५१ हजार रुपये मुलीच्या संगोपनासाठी देण्यात येणार आहेत.

या अभिनव कल्पनेतून ‘लेक वाचवा’ अभियानाला बळकटी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय गावात कोणताही कार्यक्रम, मीटिंग अथवा शासकीय अधिकाºयांच्या भेटीचा दौरा सर्व ग्रामस्थांना समजण्यासाठी गावात ‘मेसेज अलर्ट’ योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे ही सर्व माहिती गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पोहोचणार आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची पाहणी केंद्रीय पथकाकडून नुकतीच करण्यात आली.

संगणकीकृत ग्रामपंचायत, डिजिटल
खंडाळा तालुक्याचे सभापती मकरंद मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कंपनांच्या मदतीने प्राथमिक शाळेचे नूतनीकरण व ई-लर्निंग सुविधेसह ‘डिजिटल शाळा’ बनविण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे.
 

गावच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण, आरोग्य व स्वच्छता यांसह लोकजागृतीसाठी अधिक कामावर भर देण्याचा मनोदय आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना आम्ही निश्चित साकारणार आहोत.
- चंद्र्रकांत पाचे, सरपंच
 

Web Title:  Welcome to the birth of daughter in Dhangarwadi: If you plant the tree, then deposit upto 30 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.