मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:03 AM2019-04-27T11:03:04+5:302019-04-27T11:06:22+5:30

लोकसभा मतदानादिवशी साताऱ्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर या नगर पालिकेच्या शाळेत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.

Voting Video Crime Offensive to Viralists | मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

Next
ठळक मुद्देमुलाकडून वडिलांना बेदम मारहाणडिझेल ओतून पेटवून विवाहितेची आत्महत्या

सातारा : लोकसभा मतदानादिवशी साताऱ्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर या नगर पालिकेच्या शाळेत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.

संबंधिताने स्वत: मतदान करताना व्हिडीओ तयार केला. त्यानंतर सोशल मीडियावर प्रसारित केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मतदानाच्या केंद्रप्रमुखांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित व्हिडीओ पोलिसांकडे देण्यात आला असून, मतदानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण

घरगुती वादातून मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी साताऱ्यात घडली. जखमी वडिलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बबन बाब बाबर (वय ६०, रा. शाहूपुरी सातारा) असे मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, घरगुती कारणावरून चिडून जाऊन अमोल बाबर (वय ३०) याने वडील बबन बाबर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.


डिझेल ओतून पेटवून विवाहितेची आत्महत्या

शिवथर, ता. सातारा येथील सारिका दशरथ भंडारे (वय २३) या विवाहितेने जाचहाटाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारिकाचा विवाह दशरथ भंडारे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच तिचा जाचहाट सुरू झाला.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सात वाजता घरातील अन्य लोक झोपेत असताना सारिकाने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. त्यामध्ये ती ९९ टक्के भाजून गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Voting Video Crime Offensive to Viralists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.