आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:04 PM2019-06-23T23:04:42+5:302019-06-23T23:04:47+5:30

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे ...

Use of tractor engine to give water to the water | आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

Next

जयदीप जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील साप येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने लखोपती करणारे आले पीक वाचवण्यासाठी चक्क विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून पाणी देणे सुरू केले आहे. वीज पुरवठा बंद असल्याने ट्रॅक्टरच्या इंजिनचा मोटार म्हणून वापर कल्पकतेने केला आहे.
गेल्या बारा दिवसांपूर्वी रहिमतपूर परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे साप येथील अनेक वीज खांब जमीनदोस्त झाले होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजवाहिन्यांची जोडणी सुरू असली तरी अद्याप काही शिवारातील विंधन विहिरींवरील वीजपुरवठा बंद आहे. त्यामध्येच पुरेसा पाऊसही होत नसल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
उन्हामुळे आणि पोषक वातावरणाअभावी अनेक शेतकºयांचे आले पीक गाभाळलेय. अशी परिस्थिती निर्माण होऊन पिकाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळ्या कल्पना वापरून पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
साप येथील एका शेतकºयाने आपल्या विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून इंजिनचा मोटरप्रमाणे वापर करून विहिरीतील पाणी काढत स्प्रिंकलरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे.
शेजारील शेतकरी हा वेगळा उपाय आवर्जून न्याहाळत असून, संबंधित शेतकºयाने केलेल्या कल्पनेचे कौतुक करत आहेत. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी विशेषत तरुण प्रयोगशील शेतकरी भेटी देत आहेत. काहीजण या अनोख्या प्रयोगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही करत आहेत. हा प्रयोग करण्याची प्रेरणा घेतात. तसेच प्रयोगशील शेतकºयाचे कौतुक होत आहे.

आले उगवणीला फटका
साधारणपणे १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आले लागवड केली जाते. मात्र, त्यावेळी तापमान सुमारे ३० ते ३५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. यंदा उन्हाळी पाऊस झाला नाही. तसेच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने आले लागवडीला पोषक वातावरण नव्हते. अशा परिस्थितीतही अनेकांनी आले लागवड केली. अयोग्य वातावरणात शेतकºयांनी वाढीव तापमानात आले लागवड करून त्याला पाणी दिल्यामुळे ३५ टक्के शेतकºयांच्या आले उगवणीला फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकºयांचे आले गाभाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पुन्हा आले लागवडीला सुरुवात केली आहे.

महागाईचे बियाणे...
जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला असतानाही अद्याप पेरणी योग्य पुरेसा पाऊस पडला नाही. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाचशे किलो (एक गाडी) आले सुमारे चाळीस हजार रुपये दर देऊन बियाण्यांसाठी खरेदी केले आहे. एवढ्या महागाईच्या पिकाची लागण केल्यानंतर ते जगवणे गरजेचे बनले आहे. त्यावर उपाय म्हणून हा प्रयोग झाला.

Web Title: Use of tractor engine to give water to the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.