उदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:51 PM2019-03-09T14:51:58+5:302019-03-09T14:54:23+5:30

साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत, अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

Udayanaraja's ringmaster, Baramatikar Pawar: Panjabrao Patil | उदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील

उदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील

Next
ठळक मुद्देउदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील सरदार, जहागिरदारांनी जिल्ह्याची वाट लावल्याची टीका

सातारा : साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत, अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सातारा, हातकणंगले, माढा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे सहा लोकसभा मतदारसंघ लढविण्यात येणार आहेत, याची माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी, काँगे्ससह विद्यमान भाजप सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली.

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने ही पवारांच्या अधिपत्त्याखाली आहेत. स्थानिक नेतेमंडळींना मात्र कोणतेही निर्णय घेता येत नाहीत, सर्व निर्णय हे बारामतीमधून होत असतात. जिल्ह्यातील राजकारणाची काडीही शरद पवारांच्याशिवाय हालत नाही. सरदार, जहागिरदार, राजे यांना पवारांनी सत्तास्थानी बसविले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पूर्णत: वाट लागलेली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भूमाता दिंडी काढली. परंतु या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही, त्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात तर त्यांनी दर्शनही दिले नसल्याने जनतेत नाराजीची भावना आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटील हा चांगला माणूस असला तरी पवारांच्या सांगण्यानुसारच त्यांचेही राजकारण सुरु राहिले. १0 वर्षात एकही मोठा प्रकल्प सातारा जिल्ह्यात त्यांनी आणला नाही.

शेतकरी संसदेत निवडून गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगताना पाटील यांनी खा. राजू शेट्टी व आ. बच्चू कडू यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र हातकणंगले मतदारसंघात खा. राजू शेट्टी यांना विरोध का करता? असे विचारले असता हातकणंगले व माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले.

सातारा लोकसभा मतदारसंघात पंजाबराव पाटील स्वत: उमेदवारी करणार असून हातकणंगले बी. जी. पाटील, माढा लोकसभा मतदारसंघात संजय पाटील घाटनेकर, सांगलीतून डॉ. उन्मेश देशमुख, कोल्हापूरातून नितीन पाटील, उस्मानाबादमधून भीमाशंकर बिराजदार यांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केली.


चौकट..
उदयनराजे खासदार म्हणून नापास

जिल्ह्यातील शरयू, जरंडेश्वर हे कारखाने पवारांच्या ताब्यात असल्याने शेतकºयांना ऊस दर मिळण्यात अडचणी येतात. जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांवर पवारांचा दबाव असतो. त्यामुळे ते कारखाने शेतकºयाला दर देऊ शकत नाहीत, शेतमालालाही हमीभाव मिळत नाही. केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तुंच्या कायद्याचा गैरवापर करत आहे, ही सर्व परिस्थिती उदयनराजे बदलतील, असे वाटले होते, मात्र ते खासदार म्हणून पुर्नत: नापास ठरले, अशी टीकाही पाटील यांनी केली.

Web Title: Udayanaraja's ringmaster, Baramatikar Pawar: Panjabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.