उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:25 PM2018-03-10T15:25:55+5:302018-03-10T15:25:55+5:30

खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपीआय पक्षात याव. हे दोन दिग्गज नेते आमच्या पक्षात आले तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

Udayan Raje, Narayan Rane to be eighth, and two veteran leaders get the same for the RPI party | उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

Next
ठळक मुद्देउदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफरदिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

सातारा : खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपीआय पक्षात याव. हे दोन दिग्गज नेते आमच्या पक्षात आले तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे आहेत. त्यांना माननारा वर्ग मोठा आहे. ते आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे. राष्ट्रवादीने आगीमी निवडणुकीमध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं नाही तर आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना तिकीट दिलं जाईल.

लोकसभेला माझी आणि उदयनराजेंची या दोन जागा निवडून आल्या तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल. उदयनराजे ज्यावेळी मला भेटले तेंव्हा मी त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट करून नारायण राणेंनाही आठवलेंनी पक्षात येण्याची आॅफर दिली.

मंत्री आठवले म्हणाले, राज्यसभेसाठी नारायण राणेंची धडपड सुरू आहे. मात्र, इथे नेमके काय होईल, ते आत्ता सांगता येणार नाही. त्यांनीही आरपीआय पक्षात यावं. या पक्षामध्ये सर्वांना सामावून घेतलं जातं. केवळ दलितांचाच हा पक्ष आहे, असे नव्हे.

Web Title: Udayan Raje, Narayan Rane to be eighth, and two veteran leaders get the same for the RPI party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.