चंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 03:55 PM2019-03-29T15:55:54+5:302019-03-29T15:58:02+5:30

सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.

Two confidential meetings at Chandrakant Das' night, a dialogue with the people of Satara | चंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद

चंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद भाजप नगरसेवकांच्या घरीही दिली भेट

सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यात झाली होती. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा, केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना युतीचाच उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.

साताऱ्यातील उमदेवार शिवसेनेचा असलातरी पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताऱ्यातील भाजपचे नगरसेवक असणाऱ्या धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सागर पावशे, आशा पंडित, सिद्धी पवार, प्राची शहाणे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला.

खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतो; पण साताऱ्यात तसे होताना दिसून येत नाही. याचा विचार आता नागरिकांनीच करण्याची गरज आहे, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताऱ्यात दोन-तीन ठिकाणी गोपनीय बैठकाही घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत ते कोणाशी बोलले, काय चर्चा केली? याचे स्पष्टीकरण देण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला.

Web Title: Two confidential meetings at Chandrakant Das' night, a dialogue with the people of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.