दिल्ली, मुंबईतीलच खरे देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:09 PM2017-08-20T23:09:52+5:302017-08-20T23:09:52+5:30

True traitor of Delhi, Mumbai | दिल्ली, मुंबईतीलच खरे देशद्रोही

दिल्ली, मुंबईतीलच खरे देशद्रोही

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले. आज देशाच्या सिमाही सुरक्षित नाहीत. त्यामुळे दिल्ली व मुंबईत बसलेलेच खरे देशद्रोही असून, ते जनतेची फसवणूक करीत आहेत,’ असा घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी केला.
येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते.
यावेळी मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, स्वाभिमानीचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, दशरथ फुले, अ‍ॅड. नरसिंह निकम, राजेंद्र भगवान, डॉ. रवींद्र घाडगे, मोरेश्वर जाधव, राजेंद्र ढवण-पाटील, योगेश पांडे, सतीश काकडे, प्रकाश भोंगळे, हणमंतराव शिंदे आदी उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अमंलबजावणी करू, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला चांगला भाव देऊ, असे आश्वासन देत भाजप सरकार केंद्रात आले. तत्पूर्वी, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ते राज्य प्रगतीपथावर नेले होते. त्यामुळे आम्हीही लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला. बहुमताने हे सरकार सत्तेवर आले. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यांनी शेतकºयांसाठी काहीच केले नाही.’
‘निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या नावाने बोलणाºयांनी सत्तेवर येताच पाकिस्तानमधून कांद्याची आवक करून भारतातील शेतकºयांचे दर कोसळवले. या सरकारच्या काळातच देशात आणि राज्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दिल्ली व मुंबईत बसलेले खरे देशद्रोही आहेत,’ असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
खासदार शेट्टी पुढे म्हणाले, ‘शेतकºयांचा सातबारा कोरा व्हावा, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी आदींबाबत आमचा लढा संपूर्ण भारतात सुरू असून, देशभरातील १२६ संघटनांना एकत्र करून आम्ही संघर्ष सुरू केला आहे. आमच्या संघर्ष यात्रेवर टीका करणाºयांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, कर्जमाफीचे नियम अत्यंत कडक व कठीण असल्याने शेतकºयांचा काहीच फायदा होणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी दि. २० नोव्हेंबर रोजी जंतरमंतर दिल्ली येथे मोर्चा आणि आंदोलन उभारणार
आहे. त्यामुळे शासनाला नक्कीच जाग आल्याशिवाय राहणार नाही.’
कर्जमाफी म्हणजे टकल्याला फुकटात तेल...
‘आमच्या तीव्र आंदोलनाची आणि शेतकºयांच्या आक्रोशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शेतकºयांसाठी ३४ हजार कोटींची मोठा गाजावाजा करीत कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यासाठी निकष व अटी कठीण ठेवल्या. यामुळे फायदा कोणालाच होणार नाही. ही कर्जमाफी म्हणजे टक्कल पडलेल्या माणसाला फुकटात तेल व कंगवा देण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचा काही उपयोग नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत,’ अशी टीकाही खासदार राजू शेट्टी यांनी केली.
सातारा जिल्ह्यात संघटनेत व्यापक फेरबदल...
सातारा जिल्ह्यातील पक्ष व संघटनवाढीकडे आपण आता लक्ष देणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांवर जे लढा उभारणार नाहीत त्यांनी घरी बसावे. काहीही कामे न करता नुसता बिल्ला लावणाºयांची आम्हाला गरज नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: True traitor of Delhi, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.