वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:34 PM2018-02-22T22:34:08+5:302018-02-22T22:36:04+5:30

मलटण : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील झाडावर याच कार्यालयाने कुºहाड चालवली.

Trees are ours ... the trees of the fruit can break the trees! | वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे!

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे!

Next

विकास शिंदे ।
मलटण : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील झाडावर याच कार्यालयाने कुºहाड चालवली. झाडाशेजारीच ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ हा संदेशही कुऱ्हाडीचे वार करणाºयांना दिसला कसा नाही?, असा सवाल वृक्षप्रेमींकडून विचारला जात आहे.

फलटण येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या इमारतीच्या प्रांगणात एक सुबाभळीचे झाड होते. हे झाड एका बाजूने उन्मळू लागल्याने रस्त्यावर पडण्याची शक्यता होती म्हणे. याच्या काही फांद्या कंपाऊंड भिंतीच्या आधारे टेकून उभ्या होत्या. वास्तविक, हे झाड कधीही पडले असते. शेजारून सतत वाहणारा रस्ता असल्याने झाड रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता अधिक होती, असेही सांगितले गेले.

मात्र, हे झाड काढले गेले, त्याच्या शेजारीच ‘झाडे लावा झाडे जगवा,’ असा भिंतीवर मजकूर रंगवला गेला आहे. यातलं ‘झाडे जगवा’ हे सामाजिक वनीकरण कार्यालयासाठी बहुतेक लागू नसावे.

आज अनेक यंत्र उपलब्ध आहेत, एका बाजूने उन्मळू लागलेला हा वृक्ष खरोखरच बुंध्यापासून तोडण्याची शक्यता नव्हती, हे झाड वाचवता आले असते, याचे पुन:रोपण करता आले असते, यात हे झाड जगण्याची पन्नास टक्के तरी शक्यता होती; पण एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देणारे वनीकरण स्वत: मात्र कोणताच प्रयत्न न करता झाड बुंध्यापासून कापून काढला.

फलटण सुशोभित होत असताना नवीन अनेक वृक्षलागवड चालू असताना जुनं झाडही वाचवता आलं असतं. कदाचित ते जगलं नसतं; पण सामाजिक वनीकरणाचा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहचला असता; पण आता त्याचा बुंधाच फक्त शिल्लक आहे.


पुन:रोपण व्हायलाच हवे
पुन:रोपण ही प्रक्रिया खर्चिक असली तरी ती आजची गरज आहे. या माध्यमातून आपण थोडे तरी वृक्ष वाचवू शकतो. पुणे मेट्रोच्या कामावेळी असे अनेक वृक्ष वाचवले होते. पुणे-पंढरपूर महामार्गाच्या कामात अशी खूप झाडे वाचवली होती. आज ती चांगली बहरली आहेत.

फलटण येथे ‘वृक्ष वाचवा’ फलकांच्या साक्षीने तोडलेल्या झाडाचे ओंडके अशा पध्दतीने पडले होते.

Web Title: Trees are ours ... the trees of the fruit can break the trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.