ठळक मुद्देघातपाताचा संशय एसटी अपघात झाल्याचा आई-वडिलांचा आरोप

 

साखरवाडी (फलटण) : रस्त्याच्या कडेला एका सहा वर्षीय बालिकेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे मोठा जमाव जमला आहे. काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. ही घटना सोमवारी सकाळी फलटण तालुक्यातील जिंती येथील दत्त मंदिराजवळ घडली. सायली बर्गे शिंदे असे मृत बलिकेचे नाव आहे. 

दरम्यान, एसटी अपघातात सायलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच जमा झालेल्या संतप्त जमावाने एसटीची तोडफोड करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर तणाव निवाळला.