Notice: Undefined index: primarytag in /usr/share/nginx/lokmat_ingester/plugin/jsonLdCommon.php on line 73
Sub-committee got new employees! | विषय समितींना मिळाले नवे कारभारी ! | Lokmat.com

विषय समितींना मिळाले नवे कारभारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 12:08am

कºहाड : कºहाड पालिकेच्या स्थायी समितीतील सभापती व सदस्यपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. ‘बांधकाम’ सभापतिपदी हणमंत पवार तर ‘महिला व बालकल्याण’ समिती सभापतिपदी आशा मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. कºहाड ...

कºहाड : कºहाड पालिकेच्या स्थायी समितीतील सभापती व सदस्यपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. ‘बांधकाम’ सभापतिपदी हणमंत पवार तर ‘महिला व बालकल्याण’ समिती सभापतिपदी आशा मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. कºहाड पालिकेतील महत्त्वाच्या समजल्या जाणाºया सात विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी विशेष सभेत स्थायी समितीच्या निवडी उत्साहात पार पडल्या. मंगळवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत कºहाड पालिकेची विशेष सभा पार पडली. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय समितीच्या सभापतिपदासाठी असणारे नामनिर्देशन पत्र स्वीकारले. यानंतर पीठासन अधिकारी हिम्मत खराडे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली व निवडी जाहीर केल्या. यामध्ये महत्त्वाच्या सहा समितीतील सदस्य बदले गेले. स्थायी समिती उपसभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतिपदी यापूर्वी असलेले सदाशिव यादव यांच्या जागी हणमंत पवार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी विजय वाटेगावकर यांच्या जागी प्रियांका यादव, पाणी पुरवठा आणि जलनि:स्सारण समिती सभापतिपदी अरुणा पाटील यांची निवड करण्यात आली. तर नियोजन व शहर विकास समिती व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी, उपसभापतिपद ही निवडण्यात आले. स्थायी समितीच्या विविध विषय समितीच्या सदस्य, सभापतिपदांच्या निवडी पालिकेच्या सभागृहात शांततेत पार पडल्या. यावेळी पालिकेत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभापतींच्या निवडी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी केली. तसेच निवडीनंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पीठासन अधिकारी हिम्मत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला. लोकशाहीकडून ‘सह्याद्रीचे वारे’ भेट कºहाड पालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापती व सदस्य निवडी करण्यात आल्या. यावेळी लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी नवनियुक्त विषय समिती सभापतींचा ‘सह्याद्रीचे वारे’ पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

संबंधित

स्ट्रॉबेरी, भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव : वाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण
महास्वच्छता अभियानात दहा हजार ग्रामस्थांचा सहभाग
सांगली : स्वाभिमानीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक नोटांची उधळण
साताऱ्यात विनापरवाना फ्लेक्सप्रकरणी आणखी एक गुन्हा
महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक

सातारा कडून आणखी

सातारा : मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट :  लक्ष्मण माने 
लक्ष्मण मानेंची दिलगिरी अन् मराठा क्रांतीची गांधीगिरी!
शोभायात्रेने विजय दिवस समारोहास कऱ्हाडात थाटात प्रारंभ
शिक्षण विभागाचा फतवा; विद्यार्थ्यांचा झाला हिरमोड शैक्षणिक सहलींवर लगाम
पाटणला कुमार साहित्य, कवी संमेलन : रविवारी ग्रंथालय अधिवेशन, सोमवारी मुख्य सोहळा

आणखी वाचा