विषय समितींना मिळाले नवे कारभारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:08 AM2018-01-03T00:08:03+5:302018-01-03T00:09:28+5:30

Sub-committee got new employees! | विषय समितींना मिळाले नवे कारभारी !

विषय समितींना मिळाले नवे कारभारी !

googlenewsNext


कºहाड : कºहाड पालिकेच्या स्थायी समितीतील सभापती व सदस्यपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. ‘बांधकाम’ सभापतिपदी हणमंत पवार तर ‘महिला व बालकल्याण’ समिती सभापतिपदी आशा मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
कºहाड पालिकेतील महत्त्वाच्या समजल्या जाणाºया सात विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी विशेष सभेत स्थायी समितीच्या निवडी उत्साहात पार पडल्या. मंगळवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत कºहाड पालिकेची विशेष सभा पार पडली. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय समितीच्या सभापतिपदासाठी असणारे नामनिर्देशन पत्र स्वीकारले. यानंतर पीठासन अधिकारी हिम्मत खराडे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली व निवडी जाहीर केल्या.
यामध्ये महत्त्वाच्या सहा समितीतील सदस्य बदले गेले. स्थायी समिती उपसभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतिपदी यापूर्वी असलेले सदाशिव यादव यांच्या जागी हणमंत पवार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी विजय वाटेगावकर यांच्या जागी प्रियांका यादव, पाणी पुरवठा आणि जलनि:स्सारण समिती सभापतिपदी अरुणा पाटील यांची निवड करण्यात आली. तर नियोजन व शहर विकास समिती व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी, उपसभापतिपद ही निवडण्यात आले.
स्थायी समितीच्या विविध विषय समितीच्या सदस्य, सभापतिपदांच्या निवडी पालिकेच्या सभागृहात शांततेत पार पडल्या. यावेळी पालिकेत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभापतींच्या निवडी जाहीर
केल्यानंतर नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी केली. तसेच निवडीनंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे,
पीठासन अधिकारी हिम्मत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला.
लोकशाहीकडून ‘सह्याद्रीचे वारे’ भेट
कºहाड पालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापती व सदस्य निवडी करण्यात आल्या. यावेळी लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी नवनियुक्त विषय समिती सभापतींचा ‘सह्याद्रीचे वारे’ पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

Web Title: Sub-committee got new employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.