आता पाण्यासाठी ‘जागते रहो’! पाणी वळवतील म्हणून व्हॉल्व्हजवळ ग्रामस्थांचा रात्रीही मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:28 AM2019-05-11T05:28:34+5:302019-05-11T05:28:57+5:30

आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ‘जागते रहो’ची आरोळी दिली जायची. पण माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत.

 'Stay awake' for water now! Villagers stay at night as the water turns around the valve | आता पाण्यासाठी ‘जागते रहो’! पाणी वळवतील म्हणून व्हॉल्व्हजवळ ग्रामस्थांचा रात्रीही मुक्काम

आता पाण्यासाठी ‘जागते रहो’! पाणी वळवतील म्हणून व्हॉल्व्हजवळ ग्रामस्थांचा रात्रीही मुक्काम

Next

- नितीन काळेल
सातारा  - आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ‘जागते रहो’ची आरोळी दिली जायची. पण माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. हे पाणी दुसरीकडे फिरवू नये म्हणून ते रात्रंदिवस पहारा देत आहेत.

दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. सांगली जिल्ह्यातील झरे (ता. आटपाडी) येथे असणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून सोडलेले पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने प्रथमच निघालंय. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पण यालाही काही ठिकाणी अडसर येण्याची भीती आहे.

झरे गावाच्या जवळच्याच टेंभू योजनेच्या व्हॉल्व्हमधून आटपाडी तालुक्यातील दिघंची (जि. सांगली) गावाला पाणी जात आहे. मात्र, संबंधित गावाला जाणाºया योजनेच्या जलवाहिनीचे काम थोडेच झाले आहे. असे असलेतरी त्या गावाला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. त्यासाठी शेनवडीमार्गे ओढे, तलावातून संबंधित गावच्या हद्दीत पाणी नेण्याचा लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे अंतर खूप असल्याने संबंधित गावच्या तलावात पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यातच माण तालुक्यातील १६ गावांतूनही पिण्याच्या पाण्यासाठी मागणी होती. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्याने महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सोडले.

सध्या दोन्हीकडे पाणी सुरू आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी दोन्हीकडे जात नाही. यासाठी दिघंचीचे ग्रामस्थ व्हॉल्व्ह फिरवून जादा पाणी घेऊन जातील, या भीतीने महाबळेश्वरवाडी, कोरेवाडी, काळचौंडीचे ग्रामस्थ व्हॉल्व्हजवळ दिवसा तसेच रात्रीही मुक्काम ठोकून आहेत.

टेंभू कालव्याचा माणमधील १६ गावांना फायदा

सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ ‘दलघमी’ पाणी मिळत असून, रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळत आहे.

Web Title:  'Stay awake' for water now! Villagers stay at night as the water turns around the valve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.