ठळक मुद्देदहिगाव फाटक दिवसभरासाठी बंदवाठार मार्गे वळविली वाहतूकसंभाव्य धोके ओळखून फाटकात रुळाची पाहणी

वाठार स्टेशन (सातारा) ,दि. ०२ :  सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या रेल्वेला अनेक ठिकाणी रस्ते छेदत आहेत. त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने फाटकात लोहमार्गाची झीज होते. ती दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रुळाच्या दुरुस्ती व निरीक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवार दहिगाव फाटक बंद करण्याचे ठरवले असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.


सातारा जिल्ह्यातून पुणे-मिरज ही रेल्वे धावते. एकेरी वाहतूक असल्याने रुळावर मोठा ताण पडतो. त्यातच ठिकठिकाणी रस्त्यांनी रेल्वे रुळ छेदले आहेत. काही ठिकाणी रेल्वे फाटक आहे. तर अनेक ठिकाणी विना फाटकाची बिनधास्त वाहतूक चालते.

रस्त्यावरून ट्रक, कंटेनर, एसटी यासारखे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. सातारा जिल्हा साखर पट्टा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यातील १६ कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे फाटकात रुळ हालण्याचे प्रकार घडतात.


संभाव्य धोके ओळखून फाटकात रुळाची पाहणी व दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला. दहिगाव फाटकाचे काम सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाठारमार्गे वळविण्यात आली.