‘सात’ताऱ्यांची शाही मिरवणूक ऐतिहासिक कामगिरी : खेलो इंडिया स्पर्धेत पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:22 PM2019-01-21T23:22:37+5:302019-01-21T23:23:21+5:30

बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी

'Seven stars' royal procession historic performance: Play India medal in medal | ‘सात’ताऱ्यांची शाही मिरवणूक ऐतिहासिक कामगिरी : खेलो इंडिया स्पर्धेत पदक

खेलो इंडिया स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची सोमवारी राजवाडा ते कमानी हौद अशी शाही मिरवणूक काढण्यात आली.

Next
ठळक मुद्देखेलो इंडिया स्पर्धेत पदकांची कमाई करणाºया खेळाडूंचा गौरव

सातारा : बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी शाही मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला.

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये स्पर्धेत खर्शी येथील सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावणेत सुवर्णपदक पटकाविले. तसेच १०० मीटरचे अंतर १२.४८ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले आहे. बॅडमिंटनमध्ये आर्या देशपांडे हिने तिची सहकारी अनन्या फडके हिच्या साथीने २१-० अशी खेळी करत सुवर्णपदक पटकाविले.

वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ असे एकूण ११४ किलो वजन उचलले. तर रहिमतपूरच्या तन्वीन तांबोळी हिने २१ वर्षांखालील व ७० किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. तर वेटलिफ्टिंगमध्ये मयुरी देवरे हिने ७६ किलो, स्नॅचमध्ये ७९ किलो, क्लीन व जर्कमध्ये ९७ किलोत रौप्यपदक मिळविले. म्हसवडच्या आदिती बुगडने ३९.०८ मीटर थळीफेक टाकून कांस्यपदक पटकाविले. वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार, आर्यन वर्णेकरने जलतरण क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली.

या सर्व खेळांडूनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सातारकरांनी सोमवारी त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. राजवाडा परिसरातून कमानी हौद, कमानी हौद ते शेटे-चौक-राजवाडा अशी ढोल-ताशांच्या गजरात मिळवणूक काढली.
यावेळी सर्व सुदेष्णा शिवणकर व आर्या देशपांडे या दोघांची रथातून मिरवणूक काढली. वैष्णवी पवार, तन्वीन तांबोळी, आदिती बुगड, वैष्णवी पवार, आर्यन वर्णेकर यांची घोड्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. राजवाडा परिसरात विजेत्या खेळाडूंना सातारकरांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी व साताराकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: 'Seven stars' royal procession historic performance: Play India medal in medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.