परप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग,  सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 3:48pm

सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. ५ ते ८ जानेवारी ...

सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. ५ ते ८ जानेवारी या दरम्यान विंदा करंदीकर नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे १९ व्या ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, शेखर हसबनीस, नंदा जाधव, प्रा. साहेबराव होळ, वि. ना. लांडगे, शिरीष चिटणीस, आर. पी. निकम, प्रल्हाद पारटे आदी मान्यवर उपस्थित होते. साताºयात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. शहरात वावरताना त्यांना अनेकदा बोली भाषेत व्यवहार करताना अडथळे येतात. यातील काही लोकांना रोजच्या वापरातील वस्तंूची मराठी नावेही माहीत नसल्याचे लक्षात आले आहे.

या सर्वांना आठवड्यातून दोनदा मराठीचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी ग्रंथ महोत्सव प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी स्थळ, शिक्षक आणि वेळ याचे अंतिम नियोजन लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

संबंधित

प्रगतीसाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची गरज
विशेष मुलीसाठी तिने सुरू केली स्वतंत्र शाळा!
कुणी देशभक्ती तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले  : अभिराम भडकमकर 
दर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता
साताऱ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; भरदुपारी आले अंधारून

सातारा कडून आणखी

साताऱ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; भरदुपारी आले अंधारून
औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण
‘त्यांनी’ पीडित महिलांना दिला हक्काचा निवारा
डोक्यात पार घालून पत्नीचा खून, पती पसार : चारित्र्याचा संशय, निमित्त पैशांवरून भांडणाचे
साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

आणखी वाचा