परप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग,  सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:48 PM2018-01-03T15:48:27+5:302018-01-03T15:53:49+5:30

Satyara District Grant Festival is going to be started soon for Par Paranti Marathi category | परप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग,  सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रम

परप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग,  सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रम

Next
ठळक मुद्दे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रमपरप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग५ ते ८ जानेवारी सारस्वतांचा मेळा

सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. ५ ते ८ जानेवारी या दरम्यान विंदा करंदीकर नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे १९ व्या ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, शेखर हसबनीस, नंदा जाधव, प्रा. साहेबराव होळ, वि. ना. लांडगे, शिरीष चिटणीस, आर. पी. निकम, प्रल्हाद पारटे आदी मान्यवर उपस्थित होते.

साताºयात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. शहरात वावरताना त्यांना अनेकदा बोली भाषेत व्यवहार करताना अडथळे येतात. यातील काही लोकांना रोजच्या वापरातील वस्तंूची मराठी नावेही माहीत नसल्याचे लक्षात आले आहे.

या सर्वांना आठवड्यातून दोनदा मराठीचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी ग्रंथ महोत्सव प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी स्थळ, शिक्षक आणि वेळ याचे अंतिम नियोजन लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

Web Title: Satyara District Grant Festival is going to be started soon for Par Paranti Marathi category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.