सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 4:19pm

काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली. गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे.

सातारा : काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली. गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी अनेकांना तोंडी व लेखी नोटिसा बजावल्या आहेत. स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. मात्र, अनेकांनी अद्यापही रस्त्याच्या शेजारून खोकी हटविली नाहीत. आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग या लोकांशी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते.

बळाचा वापर करण्यापेक्षा गोड बोलून अतिक्रमण काढण्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा भर आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणारी मोहीम दुपारी दोन वाजले तरी सुरू नव्हती. काही व्यावसायिकांनी विरोध केल्यामुळे ही मोहीम खोळंबली होती. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर अतिक्रमण मोहीम पोवई नाक्यावर पुन्हा सुरू करण्यात आली.

 

संबंधित

राजगुरुनगर येथे मका व्यावसयिकाचा खून
ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या
काम चालू पूल बंद, नवीन पुलावरुन होणार वाहतूक
बनावट करारनाम्याद्वारे पिकपेरा लावून वृद्धाची फसवणूक
नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

सातारा कडून आणखी

सातारा : बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणखी एकाला गंडा
कोयनाचे दरवाजे एक फुटाने उघडले, १० हजार पाण्याचा विसर्ग
सातारा :  वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरीचा प्रयत्न
कोयनेतून बारा हजार क्युसेक पाणी सोडणार
विटांनीच भरलं नदीचं पात्र

आणखी वाचा