Satara: Two cyclists kill ST A serious | सातारा : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर
सातारा : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

ठळक मुद्देएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीरसातारा तालुक्यातील कुमठे येथे अपघात

शेंद्रे : सातारा तालुक्यातील कुमठे येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्याहून राकुसलेवाडीला एसटी निघाली होती. याचवेळी परमाळे, ता. सातारा येथील शांताराम शंकर गुरव व त्यांचा एक नातेवाईक हे दोघे सकाळी साताऱ्यात कामावर येत होते. कुमठे गावच्या हद्दीत एका वळणावर दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी एसटी बसला जाऊन धडकली.

दुचाकीवर पाठीमागे बसलेला त्यांचा पाहुणा सोपान ( पूर्ण नाव पोलिसांना समजले नाही ) हा एसटी बसच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. तर शांताराम गुरव हे जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


Web Title: Satara: Two cyclists kill ST A serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.