सातारा : मांढरगडावर भाविकांचा महापूर, दर्शनासाठी हजारो गडावर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:46 PM2018-01-03T17:46:14+5:302018-01-03T17:48:44+5:30

महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. बुुधवारी उत्तर यात्रा असून, हजारो भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत.

Satara: Thousands of devotees visit Mandhargad on the fort | सातारा : मांढरगडावर भाविकांचा महापूर, दर्शनासाठी हजारो गडावर दाखल

सातारा : मांढरगडावर भाविकांचा महापूर, दर्शनासाठी हजारो गडावर दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवार, शनिवार भाविकांची गर्दी होण्याची शक्यता सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेवर लक्ष

पसरणी : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. बुुधवारी उत्तर यात्रा असून, हजारो भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत.

देवीचे दर्शन घेण्यासाठी सातारा, मुंबई, पुणे, बीड, अहमदनगर, ठाणे, रायगड, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातील भाविक गडावर आले आहेत.

ठिकठिकाणी राहुट्या टाकून भाविकांनी मुक्काम केला. गावातील तळ्यापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नारळ, पूजेचे साहित्य, फोटो, रंगीबेरंगी धागे, हॉटेल्स, मिठाईची व खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.

अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेवर लक्ष ठेवले जात आहे. ट्रस्टच्या वतीने मुख्य ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक नकाशा व सूचना फलक लावण्यात आले आहेत.

शुक्रवार, शनिवार, अमावस्या, पोर्णिमेस मांढरगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रंचड गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला अजून आठवडाभर गडावर मुक्काम करावा लागणार आहे.

Web Title: Satara: Thousands of devotees visit Mandhargad on the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.