सातारा तलाठी कार्यालयातील कारभाराचा नागरिकांना फटका, तलाठी कधी येतात अन् कधी जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:07 AM2017-11-28T11:07:12+5:302017-11-28T11:14:43+5:30

गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पदरमोड करून वेळेवर दाखले मिळत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.

The Satara Talathi office gets civilian casualties, talavas never come or when are they | सातारा तलाठी कार्यालयातील कारभाराचा नागरिकांना फटका, तलाठी कधी येतात अन् कधी जातात

कार्यालयीन वेळेतही गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात बंद असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देअण्णासाहेब येतात कधी अन् जातात कधी कसलाच बसेना मेळदाखल्यासाठी दहा ते पन्नास रुपये शुल्क, सामान्य नागरिकांची मोठी लुबाडणूक, रोज शंभर ते दोनशे दाखले

गोडोली (सातारा) : येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पदरमोड करून वेळेवर दाखले मिळत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.


सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी बहुदा दिसुन येत नसल्याने तलाठी दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे. अशासकीय कर्मचारी हेच महसुली कारभार हाकत असल्याचा आरोप होत आहे.

नागरिकांना उत्पन्न, रहिवाशी, सात-बारा उतारा असे दाखले मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इतरवेळी गायब असणारे आण्णासाहेब तलाठ्यांच्या ह्यकामबंद आंदोलनाह्णवेळी मात्र जातीने हजर असतात.


कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा असताना आण्णासाहेब कधीही येतात आणि कधीही जात असल्याने आण्णासाहेबांनी नेमलेल्या काही अशासकीय कर्मचाऱ्यांचा तोरा भलताच असल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे तलाठी गायब होताच हाताखालचेच झाले अण्णासाहेब असाच कारभार असल्याचे काही नागरीकांनी लोकमतला सांगितले.


दररोज शंभर ते दोनशे दाखले

संबधीत तलाठी कार्यालयाकडून दाखल्यासाठी दहा ते पन्नास रुपये शुल्क आकारले जात असल्याने सामान्य नागरिकांची मोठी लुबाडणूक होत आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे शंभर ते दोनशे दाखले दिले जातात. त्यामुळे तरी या ठिकाणच्या तलाठ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: The Satara Talathi office gets civilian casualties, talavas never come or when are they

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.