सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:28 PM2018-02-13T17:28:18+5:302018-02-13T17:32:52+5:30

महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला जाण्यासाठी बामणोली येथून बोटीने जावे लागते. बोटीसाठी मंगळवारी सकाळपासूनच बामणोलीत गर्दी केली होती.

Satara: Several steps for turning Maha Shivaratri's visit to Wagheshwar on Fort Vaasota | सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

Next
ठळक मुद्देशिवालयांमध्ये दर्शनासाठी गर्दीकिल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

सातारा : महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला जाण्यासाठी बामणोली येथून बोटीने जावे लागते. बोटीसाठी मंगळवारी सकाळपासूनच बामणोलीत गर्दी केली होती.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शंभू महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षी महाशिवरात्रीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येत असतात. त्याचप्रमाणे साताऱ्याच्या चारही बाजूंना शिवशंकराची मंदिरे आहेत.

कोटेश्वर, कुरणेश्वर, जंरडेश्वर आदी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या मंदिरांमध्ये बेल, दवणा वाहून मनोभावे दर्शन घेताना भाविक दिसत होते.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या दुर्लक्षित; परंतु ऐतिहासिक अशा जागृत महादेव मंदिरांचा ह्यलोकमतह्णने शोध घेऊन रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे असंख्य भाविकांनी या दुर्गम ठिकाणच्या मंदिरात दर्शनासाठी जाणे पसंत केले.

महाशिवरात्रीनिमित्ताने शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेकांनी निसर्गात सानिध्यात असलेल्या किल्ले वासोटा परिसरातील वाघेश्वरला जाण्यासाठी बामणोली येथे गर्दी केली होती.

Web Title: Satara: Several steps for turning Maha Shivaratri's visit to Wagheshwar on Fort Vaasota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.