Satara: School bus stomach; Due to the condescension of the driver, ten children escaped | सातारा : स्कूलबसने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे दहा मुलं बचावली

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाने कोळकीजवळ अचानक घेतला पेट चालकाने सर्व दहा मुलांना काढले सुखरूप बाहेर मोठी दुर्घटना टळली, चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने टळला अनर्थ

फलटण (सातारा) : फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाने कोळकीजवळ सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्वच्या सर्व दहा मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील हायस्कूलच्या मुलांना एका व्हॅनमधून ने-आण केली जाते.
 

सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ही बस दहा मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. कोळकीजवळ बस आली असता अचानक धूर निघू लागला. त्यामुळे चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मुलांना ताबडतोब बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.

फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील हायस्कूलच्या मुलांना घरी घेऊन निघालेल्या स्कूलबसने सोमवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टळला.