सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:10 PM2018-06-28T14:10:23+5:302018-06-28T14:13:14+5:30

शाहूपुरीत अज्ञातांनी फोडलेल्या वाहनांची दुरुस्ती वाहन मालकांनी करुन घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ८ ते १0 गाड्यांच्या काचा फुटल्या. काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध लागायचा तेव्हा लागेल, त्याआधी वाहन वापरायला तयार ठेवण्यासाठी खिशाला भुर्दंड बसत असतानाही वाहनधारकांनी वाहनांची दुरुस्ती करुन घेतली आहे.

Satara: Repair of owners of broken vehicles, Khishi Bharatand | सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड

सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड

Next
ठळक मुद्देफोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंडपोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु ; गस्त वाढवली

सातारा : शाहूपुरीत अज्ञातांनी फोडलेल्या वाहनांची दुरुस्ती वाहन मालकांनी करुन घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ८ ते १0 गाड्यांच्या काचा फुटल्या. काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध लागायचा तेव्हा लागेल, त्याआधी वाहन वापरायला तयार ठेवण्यासाठी खिशाला भुर्दंड बसत असतानाही वाहनधारकांनी वाहनांची दुरुस्ती करुन घेतली आहे.

वाहनांच्या काचा फोडणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शाहूपुरी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे.

रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. लोकमतने गुरुवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिध्द केले. बुधवारीही आॅनलाईन लोकमत वर वृत्त झळकले होते. याची दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी जयविजय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, गडकर आळी, सर्वोदय नगर, मोळाचा ओढा, सैदापूर फाटा या परिसरात जाऊन चौकशी केली.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जागोजागी सर्चिंग केले. पीसीआरचे वाहनही मध्यरात्री शाहूपुरी, सैदापूर, मोळाचा ओढा परिसरात फिरविण्यात आले. मात्र, काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध
लागला नाही.

वाहन फोडणारा हा माथेफिरुन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी एका अनोखळखी व्यक्तिवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनधारकांना ८ ते १0 हजारांचा भुर्दंड

काही जण घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना वाहनाच्या काचा फुटल्याचे निदर्शनास आले. ही वाहने वेगवेगळ्या ठिकाणची असल्याने सुरुवातीला मुले खेळत असताना चेंडू लागून काच फुटली असावी, असा अंदाज काहींनी बांधला त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नव्हती. मात्र वाहनाच्या दुरुस्तीसाठी ३ हजार रुपयांपासून ते १0 हजारापर्यंत भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागला आहे.

Web Title: Satara: Repair of owners of broken vehicles, Khishi Bharatand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.