सातारा : खड्डा मुजवला; पण अपघाताचा धोका कायम!, रस्त्याच्या मध्यावरच स्थिती, खडी अन् माती विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:51 PM2018-01-20T16:51:25+5:302018-01-20T16:58:01+5:30

सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Satara: Pudded; But the danger of accidents is permanent !, the situation in the middle of the road, standing and soil displaced | सातारा : खड्डा मुजवला; पण अपघाताचा धोका कायम!, रस्त्याच्या मध्यावरच स्थिती, खडी अन् माती विस्कटली

सातारा : खड्डा मुजवला; पण अपघाताचा धोका कायम!, रस्त्याच्या मध्यावरच स्थिती, खडी अन् माती विस्कटली

googlenewsNext
ठळक मुद्देखड्डा मुजवला; पण अपघाताचा धोका कायम! रस्त्याच्या मध्यावरच स्थितीखडी अन् माती विस्कटली

सातारा : येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी दोन ठिकाणी खड्डे खोदण्यात आले होते. जेसीबीच्या साह्याने काम करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे काही दिवस काम रखडले होते.

शेवटी ब्रेकरच्या साह्याने चर खोदण्यात येऊन काम करण्यात आले. यासाठी सुमारे आठ दिवस लागले. हे काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे भरले. त्यातील एक खड्डा रस्त्याच्या मध्यावरच असून, तेथील माती व खडी आता रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहिला आहे.

एखादे वाहन भरधाव येऊन खडीवरून घसरल्यास गंभीर होऊ शकते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी येथील खड्डे डांबराच्या साह्याने चांगल्यारीतीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Satara: Pudded; But the danger of accidents is permanent !, the situation in the middle of the road, standing and soil displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.