सातारा : फलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:47 PM2018-03-15T13:47:14+5:302018-03-15T13:47:14+5:30

फलटण तालुक्यातील पश्चिम भागात आदर्की, सासवड, हिंगणगाव परिसरातील गावात बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठा आवाज झाला. त्यामुळे गावागावांतील चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे. या आवाजाचे गूढ उकलले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Satara: In the Phaltan taluka, the discussion sparked a mysterious voice | सातारा : फलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाण

सातारा : फलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाण

Next
ठळक मुद्देफलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाणगावागावांतील चौकाचौकात चर्चा

आदर्की : फलटण तालुक्यातील पश्चिम भागात आदर्की, सासवड, हिंगणगाव परिसरातील गावात बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठा आवाज झाला. त्यामुळे गावागावांतील चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे. या आवाजाचे गूढ उकलले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, शेरेचीवाडी, बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, सासवड, टाकुबाईचीवाडी आदी गावांत बुधवारी रात्री आठच्या दरम्यान मोठा आवाज झाला.

या आवाजामुळे जमीन हादरली तसेच घरावरील पत्राही वाजू लागल्याने लोक बाहेर आले; पण आवाज कुठून व कशाचा आला? याचे गूढ सकाळपर्यंत उकलले नसल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

Web Title: Satara: In the Phaltan taluka, the discussion sparked a mysterious voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.