सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:22 PM2019-01-12T13:22:47+5:302019-01-12T13:28:43+5:30

खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Satara: Offshore Front of Projects in industrial colonies, towards Mumbai | सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना

सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना

Next
ठळक मुद्देखंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चाशेकडो नागरिक सहभागी; घोषणाबाजीने मुंबईच्या दिशेने रवाना

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

प्रकल्पग्रस्तांची भूसंपादनात फसवणूक झाली आहे. सरकारच्या डोळ्यावरील गांधारीची पट्टी दूर करण्यासाठी या अन्यायाविरोधात शनिवार, दि. १२ रोजी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत सर्व शेतकरी व खातेदारांनी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला होता.


त्यानुसार तालुक्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, भादेसह दहा गावांमधील शेतकरी यामध्ये सहभागी झाले. सकाळपासूनच आंदोलक खंडाळा तहसील कार्यालय परिसरात येऊ लागले. तेथे सुरुवातीला छोटी सभा झाली. नेत्यांनी या सभेत मोर्चाचा हेतू सांगितला. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. जोरजोरात घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Web Title: Satara: Offshore Front of Projects in industrial colonies, towards Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.